चारोळ्या...

पाऊस आणि मी कधीही बरसतो...
मिलनाच्या ओढीने नकळत तरसतो...-- विक्रम वाडकर


थेंब पडू लागले..अन हाक लागे श्रावणा...स्पर्श तुझा होता मनी ओल्याचिंब भावना...--विक्रम वाडकर


मऊ मखमली तुझा स्पर्श हा,
वेड लावतो माझ्या जिवा...
शब्द वेडे मनात येती अन्,
कसा सावरु माझी जिव्हा...--विक्रम वाडकर

पाऊस धारांचा असो वा असो आठवणींचा...
भिजवतोच तो मग उरतो ओला स्पर्श.. साठवणींचा...-- विक्रम वाडकर

पावसाचे अन् माझे नाते जुने-पुराणे...
माझ्या शब्दांना त्याच्या लयकारीचे गाणे...--विक्रम वाडकर


सुईसारख्या बोचतात,
कोसळणा-या सरी..
आठवणींच्या सुया..

असती माझ्या अंतरी..-- विक्रम वाडकर

क्षण आहेत ओले सारे.. थोडा गोडवा अन् काही क्षार आहे त्यांना...
वेचणा-या शब्दांना जरा जपून उचल...अजुनही धार आहे त्यांना...-- विक्रम वाडकर


कधी कधी क्षणांना मोकळिक द्यावी आपण..फक्त आपल्यासाठी...
मनातलं दुखः येऊ द्यावं आसवांतुन.. फक्त आपल्यासाठी...--विक्रम वाडकर.


सर्व जणांमधे, खास आहे तु, 
जागेपणी मिळणारा भास आहे तु,
दुर ठेव तुजपासुन पण विसरु नको मजला..माझ्या आयुष्याचा श्वास आहे तु-- विक्रम वाडकर

विरह मांडुनी मनातले, उघडली माझ्या मनाची दारे...भिडले आज काळजाला, या विरहांचे शब्द सारे...--विक्रम वाडकर





नको स्मरु तु सारी आठवणींची माळ,
आठव फक्त माझ्या डोळ्यातील आभाळ...----------- विक्रम वाडकर

मोह न आवरे सुर्यालाही... मोह न आवरे दर्यालाही....
कांती झाली चिंब तुझी अन्, माझी झाली लाही लाही......-------विक्रम वाडकर

मोहरुनीया नदी ही सागरा जाउन मिळे.... 
नकळत फुलवी संगे काठावरले मळे....----------विक्रम वाडकर

जगलो सा-या जगतासाठी.. शिकलो फक्त देणे...
तरीही आले नशीबी आमच्या ..निवडुंगाचे जिणे...----विक्रम वाडकर

 जवळ येता तुझ्या आडवी येती बंधने....
जाणवतात मजला ओली तुझी स्पंदने.....---विक्रम वाडकर.

श्वास काही शिकवतात... जगण्यातील भावना....काहीश्या वेदना.. अन काही साधना.....-विक्रम

मनावर जखम करुन गेले तुझे तीक्ष्ण शब्द,
एका क्षणात विरुन गेले स्वप्नांचे प्रारब्ध...--विक्रम वाडकर



रात्र असते आठवणींसारखी, रोज काळोख घेऊन येते..
तुझ्यासोबत घालवलेले क्षण, मनावर मळभ भरुन जाते..-विक्रम वाडकर.



भिजणारे क्षण उरतात गालांवर काही काळ..
पण भिजरी करून जातात रोज उजाडणारी सकाळ...विक्रम वाडकर

स्वप्न पाहणं सोडलं या डोळ्यांनी... 
आता फक्त सत्य पाहतात ते...

सत्य जे कडु असतं असे सगळे म्हणतात..
पण सामोर जायला सगळेच घाबरतात..--विक्रम वाडकर.


नयनांना कळते, 
तुझ्या नयनांचे भाष्य,

जन्म घेते तेव्हा,
नव्या स्वप्नांचे दॄष्य...-विक्रम वाडकर

तुझ्या डोळ्यातील प्रितीची,
भाषाच जणू वेगळी...

वेडे करून टाकण्याची,
रितच तुझी आगळी--विक्रम वाडकर.


सुर्याला मावळताना पाहून,
खुप बरं वाटत...
यासाठी नाही की तो चाललाय..
पण यासाठी की,
आज डोळ्यात पाणी ठेवून गेलेला तो,
उद्या तरी नवीन सुखा्ची पहाट घेऊन येईल...--विक्रम वाडकर


म्हणे पहाटेची स्वप्नं खरी होतात..
पण माझ्या स्वप्नांचीच होत नाही पहाट...
मनात येतात गहिवरलेले भाव..
मग सापडते त्यांना..स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांचीच वाट..--विक्रम वाडकर..




सगळ्याच आठवणी चांगल्या नसतात..आठवायला..
सगळ्याच वस्तु उपयोगी नसतात जगात..साठवायला..- विक्रम वाडकर



शब्द तुझे येता प्रतिसाद मी हा द्यावा,
तुला कळ येता अश्रु माझ्या नयनी यावा....

जीवनात सुखांनी तुजला वर्षाव रोज व्हावा,
माझ्या जगण्यातील आनंदाला स्पर्श तुझा असावा

----------------------
का आहे आज माझा श्वास दाटलेला,
स्पष्ट शब्द सारे पण सुर फाटलेला,
ओंजळ अक्षरांची कागदांवरी या,
तरी हरेक शब्द माझा असे का बाटलेला.....--विक्रम वाडकर


----------------------
क्षण तुझ्या प्रत्येक भेटीतला ,
क्षण तुझ्या प्रत्येक नजरेतला ;
क्षण तुझ्या आठवनिंचा ,
गालावर येउन थबकलेला..!!!!


----------------------
ओठामधे फ़क्त तुझा सुर आहे ,
डोळ्यामधे माझ्या अश्रुपुर आहे ,
रात-दिन मी तुज्यासाठी झिजलो ,
तुझे मन मात्र किती क्रूर आहे...||


----------------------
प्रेम प्रेम प्रेम असत तरी काय?;
अर्थ न्हाय बोध न्हाय, फुकाट डोक खाय..;
दिस असो वा रात त्याचीच असते हाय;
मग प्रेमाच्या भंगाचा दूसरा विलाज न्हाय॥!!


-----------------------
जन्माला येताना न्हवत काही,
मरताना ही नसेल काही ....|

असतील त्या फ़क्त तुझ्या आठवणी,
आणि रडतील या दिशा दाही ....||

--------------------
जाता जाता ती, हृदयावर घाव करून गेली,
माझ्या या शब्दांना कवितेचे नाव् करून गेली---विक्रम वाडकर.

--------------------

तलवारीपेक्षा शब्दांना असते जास्त धार,
तलवार शरीर जानते, पण शब्द मनाच्या पार

-------------------------

पावसाचा हरेक थेंब जमीनीसाठी बरसतो,
काय सांगू वेडे, हा विक्रम तुझ्यासाठी तरसतो


------------------
प्रत्येक रात्र आज मज मृत्युसमान वाटते,
दिवसाच्या सुर्याचीही भीती मनी दाटते,
दूर झालीस तू का मज पासून?,
तुझ्या विचारात मग माझे आभाळ माझे फाटते....

-----------------------------

मराठा सह्याद्रित खेळविला,
मोगलांसी पायी लोळविला,
राजा आमुचा जाणता म्हणोनी,
मराठा तितुका मिळविला॥


---------------------------

माझिया नसानसात वाहते मराठी....लाभले आम्हास भाग्य जन्मलो मराठी....
बोलतो मराठी अन पूजितो मराठी....द्यायचाच पुन:जन्म मागतो मराठी....

----------------------------

कधीतरी तुला माझी आठवण येईल, जशी मला यायची..
कधीतरी तुला माझी गरज वाटेल, जशी मला वाटायची..
कधीतरी माझ्य़ावर प्रेम करशील, जसा मी करायचो..
फरक एवढाच कि तेव्हा मी नसेन................

---------------------------
पालथ्या मुठीवर ओघळलेले, अश्रु परत घेशिल का ??
तुझ्यावाचून घालवलेले, क्षण वेचुन देशिल का ??

----------------------------

शब्द कधी अलंकार असतात..

असतात कधी खोटे...

कधी पसरवी मनात गोडी..

कधी टोचती काटे..-- विक्रम वाडकर


------------------------

हळवी असतात मने जी शब्दांनी मॉडली जातात...

अन शब्द असतात जादुगार ज्यांनी माणसे जोडली जातात..-विक्रम वाडकर





आधार असावा आठवणींचा.... 

कधीच त्यांच ओझं नको....

जिवनाच्या प्रवासात...


आसवांच बोजं नको...--विक्रम वाडकर.






"तुझ्या भाळावरिल सुर्याने 

तुझेच आयुष्य जळेल...

जेव्हा तुझ्या मनाला

आठवणींचे आभाळ मिळेल.....------विक्रम वाडकर...
"





Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

सुविचार संग्रह १