सुविचार संग्रह १

असं म्हणतात की, मनापासून इच्छा असेल तर सर्व काही म
असं म्हणतात की, मनापासून इच्छा असेल तर सर्व काही मिळते.. पण मनातील इच्छेला प्रयत्नांची जोड द्यावीच लागते.. ते प्रयत्न करण्याची शक्ती तुम्हाला लाभो..
😊शुभ सकाळ😊

मदतीचा हात घेणारे बरेच असतात..
हात देणारा क्वचित भेटतो..
जर मदत घेणा-या प्रत्येकाला हे जाणवले तर जग किती सुंदर होईल..
तुम्हाला मदतीचा हात देण्याचे सौभाग्य लाभो..
😊शुभ सकाळ😊

ध्येय जितके उंच असते, तितकेच दूर असते... त्यासाठी वाट पहावीच लागते. पण ते गाठल्यावर मिळणारे समाधान अवर्णनिय असते. ते समाधान सर्वांना लाभो.
😊शुभ सकाळ😊

परिस्थिती माणसाला खुप काही शिकवते हे खरं.. पण ते शिकूण घेणं, झगडणं अन् जिंकून घेणं सगळ्यांना जमेल अस नाही. तुम्हाला ते जिंकण्यासाठी ताकत मिळो.
😊शुभ सकाळ😊

मन हे नितळ वाहत्या पाण्यासारखे असावे. पारदर्शी.. त्यात इतरांनी आपली प्रतिमा शोधावी..
वाहते यासाठी की कोणतीही मलिनता त्यात टिकून न रहावी.
😊शुभ सकाळ😊

माणसाच्या इच्छा या वाढत्या नखांप्रमाणे असतात.. परिस्थितीप्रमाणे वाढणा-या..
त्यांना वेळोवेळी प्रमाणात ठेवणे ही आपली जबाबदारी असते.
😊शुभ सकाळ😊

निसर्गाने प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी ठेवलेले असते. आळशी माणसे त्याला ओळखू शकत नाहीत. प्रयत्न करणारी माणसे त्याला संधी मानतात. आणि संधीचं सोनं करतात.
तुमची संधी तुम्ही ओळखावी ही प्रार्थना.
😊शुभ सकाळ😊

प्रकाश हा नेहमी वाट दाखवणारा असतो अस् नाही. तर तो वाट चुकवू ही शकतो.. म्हणून फक्त त्याच्या भरवशावर राहू नका.. स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष ठेवून नवीन वाट तयार करा.
😊शुभ सकाळ😊

झाडांवरची फूले ही झाडांवरच छान दिसतात. आणि तिथेच जास्त टिकतात. तसेच काही गोष्टी जशा आहेत तशा असुद्या. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करु नका. त्यांची शोभा ही स्वत्व टिकवण्यात असते.
😊शुभ सकाळ😊

माणसाचा खरा अलंकार आहे, त्याचे शब्द..
शब्द जितके खरे, तेवढा त्याच्या बोलण्याचा साज.. जपून वापरले नाही तर परिणामी शोभा जाते..
😊शुभ सकाळ😊

अपेक्षांचे ओझे घेऊन जगण्याला जगणं म्हणत नाहीत. मागणीप्रमाणे पुरवठा देणारे जिवन जगू नका. जगा कर्णासारखे. दानशूर. परत काही मिळण्याची अपेक्षा न करता..
😊शुभ सकाळ😊

गरूडाप्रमाणे आकाशात उडता नाही आले तरी चालेल,
माशाप्रमाणे पाण्यात पोहता नाही आले तरी चालेल,
पण जमिनावरच्या माणसांसोबत माणसासारखे वागलात तरी खुप झाले..
😊शुभ सकाळ😊

निसर्गाने निर्माण केलेल्या या जगात माणसाने बदल करून कितीही मोठा होण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तेच मिळते जे निसर्ग देतो. कारण निसर्ग हाच खरा इश्वर आहे..
आपण त्याचा विचार केला तर तो आपला करतो.
😊शुभ सकाळ😊

ज्याप्रमाणे काळे ढग प्रकाश दडवून टाकतात त्याप्रमाणे वाईट प्रवृत्ती चांगल्या कामावर चालून येते. पण अशा वेळी गरज असते धैर्याची. काळे ढग गेल्यावक झालेले स्वच्छ आकाश नवचेतना देऊन जाते. ते धैर्य तुम्हाला लाभो.
😊शुभ सकाळ😊

बदल करणे ही काळाची गरज आहे. पण तो कसा करायचा हे आपल्या हातात आहे. चांगले बदल हे अवघड असले तरी अंती तेच चांगली फळे देतात. विचार करा आणि बदल करा.
😊शुभ सकाळ😊

नात्यांमधला दुवा टिकून राहतो तो फक्त सामंजस्यावर. ज्या क्षणी एकमेकांना समजणे कठीण जाते, त्या क्षणी नाते देखील कात टाकते. सुंदर नात्यांची समज सर्वांना लाभो.
😊शुभ सकाळ😊

तुमची स्वप्न मोठी असू दे, कारण मोठ्या स्वप्नांना मिळवण्याची मजाच काही और असते.
आणि ते मिळवण्यासाठी करावी लागते ती सुरूवात. सुरूवात करा. यशस्वी व्हा.
😊शुभ सकाळ😊

जिद्द काय असते ती लहान मुलांकडून शिकावी.
कितीही धडपडला तरी तो इवलासा जीव स्वतःच उभा राहतो. कोणी कितीही रोखले तरी तेच करणार जे त्याला पटते. सतत खेळकर वृत्ती ठेवण्याचीही शिकवण ते देत राहतात. अशा चिमुकल्यांच्या दिवसानिमीत्त, बालदिन शुभेच्छा.
😊शुभ सकाळ😊

जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत. पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते.
तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे.
😊शुभ सकाळ😊

जगणे झाडासारखे असू द्या, नेहमी काहीतरी देणारे.. वाटसरूला सावली.. पावसातले छप्पर.. भुकेल्याची भूक.. पक्ष्यांचे घर.. नजरेला सौंदर्य.. स्वतःचे 'मी'पण टिकवताना, दुस-यांना मदत करणे हेच खरे जिवन..
😊शुभ सकाळ😊

माणसे कळत-नकळत आपल्या आयुष्यात येतात. काही टिकतात, काही निघून जातात. काही क्षणीक सुख देऊन, तर काही आयुष्यभरासाठी दुःख देऊन. पण प्रत्येक जण काहीतरी शिकवूनच जातो. म्हणून कायम शिकण्याचा दृष्टीकोन ठेवा. ते कधीही वाया जात नाही.
😊शुभ सकाळ😊

सांजेची मावळती उन्हे आणि पहाटेची कोमल उन्हे, दिसतात अगदी सारखीच..
जितकी आकर्षक व विलोभनीय असतात, तितकीच फसवी सुद्धा. म्हणूनच प्रत्येकाने आपापला सुर्य निवडावा आणि त्याच्या ज्ञानामृत प्रकाशाने जग उजळून टाका.
😊शुभ सकाळ😊

परिस्थीती माणसाला घडवण्याचे काम करते. आपण मात्र लढण्याची जिद्द ठेवून पुढे जायचे असते. आणि ते करण्यासाठी महत्वाचे असते निर्णय घेणे आणि तो अंमलात आणने. जो निर्णय घ्याल त्यावर ठाम राहण्याची शक्ती सर्वांना मिळो.
😊शुभ सकाळ😊

नुसत्या वाचनाने माणूस हुशार होत नाही. त्यासाठी वाचलेल्या गोष्टी आचरणात आणाव्या लागतात. जेव्हा त्या अंगी भिनू लागतात, तेव्हा ते ज्ञान चिरंजीव होते.
😊शुभ सकाळ😊

चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि स्वार्थासाठी न केलेले काम कधीही व्यर्थ  जात नाहीत..
😊शुभ सकाळ😊

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. पण आपण आपल्याला हव्या त्या बाजुचाच विचार करतो. आयुष्याच्या तराजू चा समतोल नियती करत असते. आपण फक्त समोर आलेल्या सत्याला सांभाळायचे असते.
😊शुभ सकाळ😊

रोजची सकाळ नवीन स्वप्न पाहण्याची असते.. स्वप्न, जी झोप लागू देत नाहीत... आणि झोप लागली तर ती तुमची स्वप्न नाही, इच्छा आहेत..
स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास घया म्हणजे समाधान काय हे कळेल.

😊शुभ सकाळ😊

समाजाच्या चुकीच्या रुढींविरुद्ध लढण्यासाठी जशी हिमतीची गरज असते, तशी त्याविरुद्ध येणारी कोणतीही टिका सहन करण्यासाठी सहनशक्तीची गरज असते. एकदा ते आपल्याला जमलं की समाजाला एक दान दिल्याचे समाधान लाभते.
😊शुभ सकाळ😊
निसर्गाने दिलेल्या मनुष्य जन्माचा वापर त्याच निसर्गाचा -हास करण्यासाठी करणे कितपत बरोबर आहे? आणि जेव्हा तो रौद्र रुप घेतो, तेव्हा जागे होण्याचा फायदा काय? निसर्गच देतो आणि घेतो. त्याची काळजी हीच आपली काळजी आहे.
😊शुभ सकाळ😊

कोणतेही नाते शांत पाण्यासारखे पारदर्शक असेल तर त्या नात्यावर विश्वास ठेवणे ही आपली जबाबदारी असते. आपल्याशी प्रामाणिक राहणा-याला हवा असतो तो फक्त विश्वास. नात्यांवर विश्वास ठेवा म्हणजे नातं तुमच्यावर विश्वास ठेवेल.
😊शुभ सकाळ😊

जगात सर्व माणसे सारखी नसतात. कोणी दुस-यांचे दुःख आपले समजतो, तर कोणाला त्रास देण्यात समाधान वाटते. पण परिणाम त्यांचाच होतो, ज्यांचा विचार आपण करत राहतो. चांगल्या माणसांचा आणि चांगल्या गोष्टींचा विचार करा. जीवन आनंदी राहील.
😊शुभ सकाळ😊

देव आपण सर्वीकडे शोधतो.. देवळात, भिंतीत, मातीत, दगडात.. पण आपण कस्तुरीमृगासारखे कस्तुरीच्या शोधात इकडे-तिकडे का फिरतो.. देव हा कस्तुरीसारखा, प्रत्येकात दरवळत असतो. आपण फक्त त्याची जाणीव ठेवायला हवी.

माणुस चांगल्या आठवणींची उजळणी करण्यापेक्षा दुःखी आणि त्रासदायक गोष्टींचा विचार करत राहतो. यामुळेच त्याला क्षणभंगूर आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी वेळ काढावा लागतो. जर आनंदी रहायचे असेल तर क्षणाक्षणात दडलेलं जीवन जगायला शिका.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक संधी. या संधीचा चांगला वापर करण्यासाठी विचार स्वच्छ, मन निर्मळ आणि मुखावर स्मित असावे. स्वतःसोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

माणसाने आपले ज्ञान सुंदर तळयासारखे समजावे. जेणे करून त्याला ही जाणिव होत रहावी कि हे ज्ञानाचे तळे समुद्रापेक्षा खुप लहान अाहे.. पण त्याचप्रमाणे डबक्यातील गढुळपणा बाजुला सारुन स्वच्छ रहाण्याची शक्ती त्यास मिळावी.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

अपघात फक्त वाहनांमुळे होत नाहीत.. काही व्यक्ती अपघाताने भेटतात.फरक इतकाच की वाहनांमुळे झालेले घाव मिटून जातात.. पण माणसांनी दिलेले घाव विसरणं कठीण असत आणि  साम्य असे की दोन्ही अपघात काहीतरी शिकवून जातात.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

चांगले मित्र हे परीसासारखे असतात. कारण त्यांच्या सहवासाने आयुष्याचं सोनं होतं. पण असे मित्र मिळवणं आणि मिळालेच तर त्यांची मैत्री टिकवणं प्रत्येकाला जमेल असं नाही.
खरे मित्र ओळखण्याची कसब सगळ्याना लाभो.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

जिथे भिती असते, तिथे प्रिती नसते.
आणि जिथे प्रिती असते, तिथे जगाची भिती नसते. प्रेम वाटणारा माणुस हा जगातील सर्वात श्रीमंत माणुस असतो. पैसा,सुख-सोई घेऊन स्वतःच्या गरजा पुर्ण करण्यापेक्षा दुस-याच्या चेह-सावर हास्य फुलवणे खरा आनंद..
-विक्रम वाडकर.😊शुभ सकाळ😊

आयुष्यात कोणतरी लागतं, आपल्या सुखात हसणारं, भरलेले डोळे पुसणारं.. चांगल्या गोष्टींना भारावणारं, वाईट गोष्टींवर रागावणारं..दुर असून जवळ भासणारं, आणि जवळ असता सोबत बसणारं.कोणतरी..ते कोणीतरी एकदा सापडलं की मन समाधानी होतं.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

जगात खुप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण महत्वाच्या २ च गोष्टी. प्रेम आणि त्याग. प्रेम शिकायचे तर आईकडून, त्याग शिकावा तर वडीलांकडून. आयुष्यभर टिकेल इतकं प्रेम आणि निस्वार्थी मनाने केलेला त्याग.इतकं शिकलात तरी आयुष्य सुंदर होईल.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

कधी आपल्या नेहमीच्या दिनक्रमापेक्षा वेगळे वागून बघा. रोजच्या दगदगीच्या आयुष्यातील थकवा निघून जाण्यासाठी. इंटरनेटच्या जाळयातून बाहेर येण्यासाठी. निसर्गाची सुंदरता न्याहाळण्यासाठी. कामासाठी तर रोज मरता, एक दिवस स्वतःसाठी जगून बघा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

कोणावर विश्वास ठेवण्या आधी तो आपल्याजवळ असायला हवा.दुस-यांना उपदेष देणारे खुप असतात. पण स्वतः त्यासारखे वागणारे कमी असतात. म्हणून इतरांचे दोष काढण्यापेक्षा स्वतःचे स्वतःवर लक्ष असू द्या.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

कधी कधी मौन हीच सर्वात उत्तम भाषा असते. कारण त्यात स्वतःच्या भावना अव्यक्त स्वरूपात मांडता येत असतात. आणि त्याहून महत्वाचे हे कि, समोरची व्यक्ती आपल्या भावना समजू शकते की नाही हे देखिल कळते.मौनाचे सामर्थ्य श्रेष्ठ.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

माणसाला जिवन जगताना साथीदाराची गरज असते. जो मौनात दडलेले शब्द ओळखेल, अश्रुंमागे असलेले दुःख ओळखेल, हास्यामधे लपलेला आनंद ओळखेल. न सांगता, न ऐकता मनाला मनाशी जोडणारे नाते म्हणजे प्रेम. 
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

काही गोष्टी माणसाच्या हाताबाहेरच्या असतात. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा, आपल्या हातात असणा-या गोष्टींमधे १००% देण्याचा प्रयत्न करा. कदाचित अशक्य ही शक्य होऊ शकते.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही. परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो.म्हणून परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

लग्न म्हणजे फक्त दोन जिवांचे बंधन नव्हे. लग्न म्हणजे दोन संसाराना जोडणारा आणि एक नवीन संसाराला जन्म देणारा सोहळा. लग्न म्हणजे एका जबाबदारीतून दुस-या जबाबदारीत उतरण्याचे पर्व. लग्न म्हणजे शुभाशिर्वादाने मंगलमय वातावरणात भविष्यास सावधान राहून केलेला प्रवेश. शुभमंगल सावधान.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

वाईट गोष्टी यासाठीच असतात कि चांगल्या गोष्टींची किंमत कळावी. पण आपण वाईट गोष्टींना दोष देण्यात इतके गुरफटून जातो कि आलेला सुखाचा क्षण ओळखत नाही. जोपर्यंत आयुष्यात दुःख येत नाही, तोपर्यंत सुखाची जाणीव होत नाही.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

आनंदी राहण्यासाठी मन प्रसन्न रहायला हवे. आणि मन प्रसन्न राहण्यासाठी चांगले विचार नेहमी मनात असायला हवे. दिवसाची सुरुवात अशा चांगल्या विचारांनी करा. आणि जमल्यास इतरांना देखिल प्रसन्न राहण्यास प्रवृत्त करा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

परिस्थिती ही सरड्याप्रमाणे रंग बदलते. क्षणात दुःख तर क्षणात आनंद. जोपर्यंत 'लवकर सुख येईल' ही आशा मनात तेवत असते, तोपर्यंत परिस्थिती लढण्याची उमेद देत राहते. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, लवकर सुख येईल.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

फळे आस्वाद देतात, फुले सुगंध देतात, निसर्ग आपल्याला सदा काही ना काही देत राहतो. कारण तो मोबदला मागत नाही. त्याचप्रमाणे जगाला फक्त प्रेम देत रहा. परत प्रेम मिळण्याची अपेक्षा करत राहीला तर तो व्यवहार होईल. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

जोपर्यंत शुन्य सुरुवातीला लिहीलेला असतो तोपर्यंत त्यालाही किंमत नसते, पण शेवटी लिहीलेल्या शुन्याने किंमत दसपटीने वाढते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस हा शुन्यासारखा असतो, बरोबर जागी बरोबर टिकला की अनन्यसाधारण किंमत मिळते.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

सामान्यतः माणसाचा स्वभाव हा त्याच्या आजूबाजूच्या परिसरानूसार बदलत राहतो. त्यामुळेच चंचलता हा त्याचा स्वाभाविक गुण असतो. त्याउलट स्थिर स्वभावाची माणसे परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य ठेवतात. म्हणून निर्णय घ्या आणि ठाम रहा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

देवाचे भक्त होण्यापेक्षा त्याचे साथीदार बना.कारण काही मागण्या पूर्ण करण्यासाठी देवाची नाही तर माणूस असण्याची गरज लागते.माणूसकी हेच खरे देवपण.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

काही जण दुस-यांच्या चुका काढण्यात इतके समाधानी असतात कि त्याना स्वतःच्या चुका देखिल बरोबर वाटतात. त्यामुळे चुका काढण्यापेक्षा बरोबर काय हे जाणून घ्या आणि त्या पटवून द्या.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

अपार मेहनत करून त्याचे फळ होत नसेल तर हताश होऊ नका. लक्षात ठेवा कि कष्टाची माती झाली तरी हरकत नाही कारण मातीतूनच देवाच्या मुर्ती तयार होतात. अनुभवाच्या जोडीने केलेले कष्ट सदगतीच्याच मार्गावर नेतात.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

संगत चांगली असेल तर चांगले विचार मनात सदैव येत राहतात. त्याउलट अनिष्ट विचारांचे सोबती असल्यास प्रकृतीने आपणदेखिल अविचारी होतो. वृत्ती आणि स्वभाव हे संगतीने तयार होतात. म्हणून सत्संगती ठेवावी.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

आदर्श ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. पण ज्याचा आदर्श ठेवला त्याने किती कष्ट घेतले हेदेखिल माहीत असु द्या. कारण फक्त देवासमोर हात जोडून यश मिळत नाही. त्यासाठी अथक प्रयत्नदेखिल करावे लागतात.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

प्रत्येकाच्या जिवनात अडथळे येत असतात. काही जण संकट म्हणून पाहतात तर काही जण कसोटी म्हणून. जे संकट टळण्याची वाट पाहतात ते तिथेच थांबतात. आणि जे लढून पुढे निघून जातात त्यांना यश कधीच हुलकावणी देत नाही.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

माणूस काही गोष्टींचा अतिविचार करतो. ज्यामुळे तो सतत त्यापासून घाबरत राहतो. काही मिळण्यापेक्षा, न मिळण्याच्या भितीने तो असे विचार करतो. हे लक्षात ठेवले पाहीजे कि भितीने फक्त क्लेष मिळतो आणि यश मिळेल या विचाराने आत्मविश्वास.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

भुतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींचा पच्छाताप करत राहण्यापेक्षा, चांगल्या गोष्टींचा आदर्श ठेऊन पुढे जात रहावे. त्यामुळे लढण्याची उमेद मिळते, चांगल्या आठवणी लक्षात राहतात आणि यशाचे मार्गदेखिल सुकर होत जातात.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

संकल्प करण्यासाठी नवीन वर्षाची वाट का पहावी? आणि आपण असे किती संकल्प दरवर्षी पूर्ण करतो? ज्यावेळी आपण स्वतःच्या मनाशी ठाम केले तो दिवस म्हणजे संकल्पदिवस... आणि नवीन वर्ष हा फक्त उत्सव असेल. इंग्रजी वर्षाखेरच्या आणि येणा-या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

येणा-या वर्षी पुर्ण करायचे संकल्प सर्वांनी केलेच असतील. काही नवे, काही जुणे... काही अधिक, काही उणे.. अशा वेळी कोणी विचार केला का, कि ज्यांच्या अविश्रांत संकल्पामुळे हे शक्य झाले, त्यांचे वर्ष कसे गेले. जर त्यांनी नशेचे आणि नाचण्याचे मनी आणले तर आपले काय झाले असते. आपले वीर सैनिक.अशा आपल्या निष्ठावान सैनिकांना मानाचा मुजरा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

जगात रंगबिरंगी फुले आहेत. काही सुंदर दिसतात तर काही वेगळी. काही लहान तर काही मोठी. पण काही आपल्या सुगंधाने मन तृप्त करतात. माणसांचेही तसेच असते. सर्वजण सारखे नसतात. पण काही थोर लोकांच्या सहवासानेच आपले जीवन धन्य होते. अशा थोर लोकांचा सहवास तुम्हास मिळो.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

समुद्रावरून किनारा गाठणारी प्रत्येक लाट नवीन असते. फक्त किना-यावर असणारी आपण माणसे तीच असतो. काही आपल्या 'स्व'तःच्या जगात समाधान माननारी तर काही परिस्थिती प्रमाणे बदलत जाणारी. आता तुम्हीच ठरवा, लाट होऊन बदल करत जगायचं कि दगड होऊन किना-यावर थिजायचं.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

झाडे जितकी जमिनीच्या वर बहरदार होत जातात, तितकीच ती जमिनीच्या आत घट्ट होत जातात. कारण त्यांनी जमिन सोडली तर त्यांचे आयुष्य तिथेच संपते. तसेच माणसानेदेखिल उंचीवर जावे, पण आपले मुळ संस्कार विसरु नये.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

लहान-सहान गोष्टींतून होणारी भांडणे, वाद ही मोठ्या मनाने समजून घेतली पाहीजेत. कारण याच लहान गोष्टींतून शिकून माणूस मोठा होत असतो.आणि त्यावेळी या लहान गोष्टींना कसे बाजुला सारावे हे त्याला ज्ञात असते.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

माणसाचे विचार साखळीने बांधलेल्या हत्तीसारखे असतात. आपण समाजातील काही निरर्थक गोष्टींचा साखळदंड तोडू शकत नाही असे आपले विचार होतात. आपल्यात दडलेली क्षमता ओळखा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते. एका बाजुला अापण आणि दुस-या बाजुला नियती. या खेळात हार नेहमी आपलीच होत असते. पण अर्थ असतो ते लढण्याला. आपण किती वेळ आणि आत्मविश्वासाने खेळतो याला महत्व असते.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

आपल्याकडे देण्यासारखे खुपकाही असते. पण दान करण्याची इच्छा असायला हवी. तराजू देखिल एक बाजू सावरण्यासाठी दुस-या बाजूला दान करतो. म्हणून आयुष्यात समतोल राखायचा असेल तर अचुक गोष्टी दान करा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

सवय ही वाईट गोष्टींची असेल तर -हास करते..आणि चांगल्या गोष्टींची असेल तर ध्यास पुर्ण करते. सवय चुकीची नसते. तिचा परिणाम चुकीची असू शकतो. चांगल्या सवयी लावा आणि यशस्वी व्हा.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

वाईट कर्म के कच-यासारखे असते. एकदा केले की वाढत वाढत त्याचा ढिग होतो. आणि हा कचरा वाईट परिणामांचा दुर्गंध पाठी सोडतो. तो कचरा स्वच्छ करण्यासाठी सत्कर्मांच्या झाडूचाच वापर करावा लागतो. कर्म चांगली असू द्या.
-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

कितीही वाईट परिस्थिती आली तरी आशेचा किरण मनात नेहमी तेवत ठेवावा. कारण जगात काही गोष्टी या फक्त आणि फक्त इच्छेच्या जोरावरही लढता येऊ शकतात. आणि त्याला प्रयत्नांची जोड असेल तर यश आपलेच असते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

ओठांवर हास्य फुलवायला शब्दांची गरज नसते. पहाटेच्या चिमण्यांचा चिवचिवाट, चेह-यावर पडणारी कोवळी सुर्यकिरणे, शरीराबरोबर मनाला स्पर्षून जाणारी मंद झुळूक यादेखिल अनामिक हास्य देऊन जातात. फक्त जाणिव असण्याची गरज असते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

पैशाच्या बाजारात कोणी सुख विकेल का? आणि दुःख विकत घेईल का? नाही. पण माणुसकीच्या नात्यात सुखाचा आनंद वाटता येतो आणि दुखाचा भार हलका करता येतो. आणि त्यासाठी माणूस असण्याची न्हवे तर माणूसकी असण्याची गरज असते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

काही नाती रक्ताने बांधलेली असतात आणि काही नाती मनाने. रक्ताची नाती दुर होऊ शकतात. पण मनाने जोडलेली नाती तुटता तुटत नाहीत आणि सुटता सुटत नाहीत. कितीही झाले तरी तीच नाती शेवटपर्यंत टिकतात.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

चंद्रासारखे दुस-याच्या प्रकाशात राहण्यापेक्षा
सुर्यासारखे तेजस्वी व्हा. पण लक्षात ठेवा तसे तेजस्वी होण्यासाठी स्वत:ला जाळावे लागते. तेव्हा कुठे आपले आणि सभोवतालचे जग प्रकाशमय होते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

देवाने आपल्याला डोळे दिले, सुंदर जग पाहण्यासाठी. तोंड दिले, चांगली वचने बोलण्यासाठी. कान दिले, चांगल्या गोष्टी एकण्यासाठी. पण त्याहून महत्वाचे मन दिले, सारे काही ठरवण्यासाठीt. कारण कधीकधी, डोळ्यानी पाहीलेले, तोंडातून बोललेले, कानांनी ऐकलेले सत्य असेल असे नाही.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

विचार करा जर पृथ्वी थांबली तर काय होईल. विनाश. जिवनात कधीही कोणत्या गोष्टीसाठी जास्त थांबू नका. जर खरच ती आपल्याला मिळणार असेल तर ती नंतरही मिळते. पण आपण थांबलो तर भविष्यच थांबते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

एक छोटी गोष्ट आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करू शकते. ती गोष्ट "भिती". अपयश येईल ही भिती. आपल्याला लोक काय म्हणतील याची भिती. इभ्रतीची भिती. जर आपले ध्येय मिळवायचे असेल तर त्या भितीलाल भिती वाटेल असे प्रयत्न करा.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


सीमेवर लढणा-या प्रत्येक सैनिकाला, त्याच्या ध्येयासाठी हार्दीक अभिवादन. 
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
जय हिंद!!

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


दिवसाच्या आनंदाची किल्ली ही शुभ्र सकाळच्या निसर्गात दडलेली असते. जो या निसर्गाचा स्वभाव ओळखू शकला, तो आनंदी राहणे शिकू शकला.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभं करोति होते, तिथे संस्कारांची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते, तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

सुंदर गोष्टी ओळखण्याची कला प्रत्येकाकडे असते, पण वाईट गोष्टी ओळखून त्यापासून दूर राहण्याची कला सर्वांकडे नसते. याचा अर्थ प्रत्येक माणूस चांगला असतो, फक्त त्याचे विचार त्याला चुकीच्या मार्गाकडे घेऊन जातात.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


दगडाची मुर्ती बनवताना, बनवणा-या मुर्तीकाराला त्याच्या मनात असलेल्या मुर्तीवर विश्वास असतो म्हणून निर्णय घेऊन तो ती कोरीव मुर्ती साकार करतो. जर निर्णय घेतलाच असेल तर त्यावर ठाम रहायला शिका. मग तयार झालेल्या मुर्तीला लोक डोके टेकवतील.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


इतरांपासून अ़पेक्षा ठेवून, अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, अनपेक्षित आनंदाचे क्षण अनुभवने कधीही चांगले. कारण त्यात दुःख नसते, आणि त्या सुखाची मजा काही औरच असते. शेवटी इच्छीत आनंदापेक्षा अनपेक्षित धक्केच आयुष्यभर लक्षात राहतात.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहीलेला असतो. काहींना ओंजळभर मिळते, तर काहींना रांजणभर. पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच. फक्त थोडी वाट पहायची असते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

रोज काहीतरी नवीन शिकण्याची संधी येणार असते. पण ते शिकण्याची जिद्द आणि शिकलेल्या गोष्टी अंमलात आणन्याचा विश्वास हे मात्र ज्याचे त्याला ठरवावे लागते. परिस्थितीने दिलेल्या संधींचा वापर कसा करावा हे कोणी सांगत नाही, ते आपणच शिकायचे असते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


घर हे माणसांमुळे आणि त्यांच्या नात्यामुळे सुंदर दिसते. तरी लोक घराच्या रंग-रुपावरून सुंदरता ठरवतात? अगरबत्ती देवासाठी लावली जाते. सुगंध मात्र आपल्या आवडीचा ठरवून घेतात? आणि माणसांचा मोठेपणा मनाच्या श्रीमंतीवर असतो. तरी लोक पैशाच्या मागेच का धावतात?

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


नजरेत नम्रता हवी. जिभेवर सभ्यता हवी.
मनात भाव हवे. काढण्यासारखे नाव हवे.
ओठांवरती स्मित हवे. इतरांसाठी हित हवे.
बोलण्यात गोडी हवी. चतुराई थोडी हवी.
दानशुरता अंगी हवी. माणुसकी चतुरंगी हवी.
स्वभाव निस्वार्थ हवा आणि जगण्याला अर्थ हवा.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


ओठांतून निसटलेले शब्द हे म्यानातून निघालेल्या तलवारीसारखे असतात. कारण धार दोघांनाही तितकीच असते. फरक इतकाच की एक जीव घेते आणि दुसरी जिवावरचा विश्वास. म्हणून शब्दांचे अस्त्र जरा जपूनच वापरावे.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊


सर्वांना माहीतच आहे की वाहते पाणी स्वच्छ असते.कारण ते नेहमी पुढे जात राहते. त्याप्रमाणे माणसाने सुद्धा आलेल्या परिस्थितीबरोबर वाहत राहीले पाहीजे. साचलेल्या डबक्याप्रमाणे भूतकाळात अडकलेल्यांना परिस्थिती स्वतःच नष्ट करते.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

पथिकाला आपल्या वाटेवर विश्वास असतो की की ती आपल्याला चुकवणार नाही. नावाड्याला आपल्या दर्यासागरावर विश्वास असतो की तो कधी बुडवणार नाही. आपण सुद्धा सत्कर्माच्या वाटेवर असाच विश्वास ठेवून चालत राहायचे असते. तो यशाच्या शिखरावर नेईल या विश्वासाने.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

मन निर्मळ असेल तर परीणामांची चिंता सोडून कार्य करावे. कारण असे कार्य नेहमी चांगलेच असते. त्यात तर यशस्वी व्हालच, सोबत अाणखी चांगले कार्य करण्याची उर्मी सदैव तुमच्या मनात राहील.

-विक्रम वाडकर.
😊शुभ सकाळ😊

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...