सुविचार संग्रह २

भरलेल्या डोळ्यांमध्ये जो स्वतःचे दुख पाहतो, तोच व्यक्ती इतरांचे दुख ख-या अर्थाने समजतो. म्हणून एखाद्याच्या सुखामधे हास्य व्हा अथवा नका होऊ, पण दुखामधे पाठीशी उभे राहीलात तरी खुप झाले..
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
08/09/2015 08:00 am

जगात ३ माणसांना कधीच दुखवू नका. पहीली जन्म देणारी आई, दुसरे रक्ताचं पाणी करून पालन-पोषण करणारे वडील, आणि जिवनाच्या प्रत्येक वाटेवर आपल्या सोबत असणारे, वेळी-अवेळी मदत करणारे जिवलग मित्र. आपले अस्तित्व यांच्यामुळेच असते.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
09/09/2015 07:54 am

स्वतःच्या पायाला उन्हाची झळ लागली की आपण पळत सुटतो. पण तीच झळ सोसून, फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही कष्ट करून शेती करणा-या शेतक-यांना काय मिळते? दुष्काळ आणि आत्महत्या? कधी त्याच्यासाठीही विचार करायला हवा. शेवटी दुःख वाटून घेतल्यावरच कमी होते.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
11/09/2015 08:14 am

माणसाच्या इच्छा फुग्याप्रमाणे असतात. आपण त्याला फुगवत जातो. पण अतिरेक झाला की तो फुटतो. मग आपण बोलतो इतका फुगवायला नको होता.. इच्छांना देखिल माणूस गरज समजू लागला तर त्याचा फुगा फुटल्यावाचून राहणार नाही.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
15/09/2015 08:09 am

चुरगळलेला कागद देखिल पुन्हा पुर्वीसारखा करणे फार मोठे काम असते. वेळ लागतो. पण अशक्य नसते. तशाच काही गोष्टी पुर्वीसारख्या करता येत नाही, पण आपण प्रयत्न सोडायचे नसतात. कदाचित त्या पुर्वीपेक्षा वेगळ्या, पण अधिक चांगल्या होतील.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
16/09/2015 07:45 am

कोणतीही गोष्ट, कितीही अवघड असो, जोपर्यंत आपण सुरूवात करत नाही तोपर्यंत त्याची पातळी कळत नाही. आणि जेव्हा अशा गोष्टींना हाताळतो तेव्हा आपल्याला आपली पात्रता कळते. म्हणून यशाचा आशिर्वाद हवा असेल तर आधी कार्याचा श्रीगणेशा करा.
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
17/09/2015 08:34 am

आपण एखादी गोष्ट परिक्षेसाठी शिकतो आहोत अशी समजूत पहिल्यापासून आपल्या मनात असते. त्यामुळे शिकणे ही केवळ पुढल्या वर्गात जाण्यासाठी केलेली धडपड समजू नका. आयुष्याच्या परिक्षेलाही शिकण्याची गोडी निर्माण केली तर त्या परिक्षेला धडपड करण्याची गरज लागणार नाही.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
17/09/2015 08:34 am

आपल्याला स्वतःच्या सावलीत कधीच उभे राहता येत नाही. त्यासाठी दुस-याचीच सावली लागते. आणि ती मिळवण्यासाठी आपण स्वतः कोणालातरी आपली सावली द्यावी लागते. शेवटी जगायचं असेल तर आपल्याला दुस-याचाच आधार लागतो. अशी जिवलग माणसे तुम्हाला मिळोत.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
19/09/2015 09:17 am

माणूस फक्त पैशाची किम्मत मोजतो आणि त्याप्रमाणे ती गोष्ट काळजीने वापरतो. काही गोष्टींची किम्मत पैशात नसते. आणि ते कळण्यासाठी ती गोष्ट हातून निघून जाईपर्यंत वाट पाहू नका. कारण अशा गोष्टी काळाप्रमाणे असतात. पुन्हा कधीच येत नाहीत.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
20/09/2015 10:12 am

आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करणा-याला समोरच्या व्यक्तीच्या उत्तराची काळजी कमी असते. कारण समाधान हे आपले मन मोकळे करण्यात असते. मग पुढे कोणीही असो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
21/09/2015 09:00 am

मन हे माणसाचं एक अदृष्य अवयव असतं. समोरच्या व्यक्तीच्या एका शब्दानेही तुटेल इतकं नाजूक. आणि इतरांना आधार देताना स्वतःच्या दुखःची पर्वा नसते इतकं कठोर. या मनाला सांभाळण्याच्या प्रयत्नात बुद्धीवादी माणसं ही लयाला जातातं. मन जपायला शिका. कारण शिकतो तोच माणूस असतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
22/09/2015 08:05 am

घाबरणं ही सहाजिक अवस्था आहे. पण आपल्याच परीस्थितीला घाबरणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे. पण इथे माणूस घडतं नाही, तर त्या परिस्थितीत तो स्वतःला कसा सावरतो आणि कसा पुढे जातो हीच त्याच्यासाठी प्रेरणा ठरते. मग पुढच्या संकटासाठी तो तत्पर राहू शकतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
23/09/2015 08:09 am

बुरसटलेल्या विचारांना घेऊन इतिहास कधीच घडत नाही. तो घडवायचा असेल तर आधुनिक आणि तत्वशील विचार असावे लागतात. अशा विचारांना घेऊन सतत त्याचा पाठपुरावा करत राहले पाहीजे. येणा-या संकटांशी २ हात केले पाहीजे. इतिहास घडवायला एवढेदेखिल पुरेसे असते.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
24/09/2015 06:56 am

प्रत्येक वस्तुची EXPIRY DATE असते. आणि त्या तारखेच्या आधी वस्तुचा पुरेपुर वापर केला तर ती निरर्थक ठरत नाही. जगणं सुद्धा मृत्यूची EXPIRY DATE घेऊन येतं. आपण फक्त जगण्याचं काम करायचं, EXPIRY DATE येण्याच्या आधी.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
25/09/2015 09:56 am

आस्तिक असो वा नास्तिक, मनामधे श्रद्धा असणे आवश्यक आहे. आस्तिकाला देवाच्या दयेवर असते आणि नास्तिकाला आपल्या मनगटातील जोरावर. पण जे घडते आहे त्याला स्विकारल्या शिवाय पुढे जाणे व्यर्थ आहे. शेवटी आस्तिक असो वा नास्तिक, निसर्गाचा निर्णय हीच नियती.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
26/09/2015 09:07 am

भरपेट जेवून सुद्धा ज्याला भुक लागते त्याला भस्म्या रोग होतो. तसेच माणसाचे असते. गरजेपुरत्या गोष्टींची भुक पुर्ण होऊनही तो अतिरिक्त सोईंची भुक मनात ठेवतो. आणि त्याची जागा हव्यासाच्या, लोभाच्या रोगाने घेतलेली असते. आणि रोग कोणताही असो, आयुष्याला कलाटणी देतो. म्हणून गरज आणि सोई यांतील फरक ओळखा.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
27/09/2015 09:56 am

राहत्या घराला स्वच्छ अन् सुंदर बनवण्यासाठी आपण किती विचार करतो. तीच धडपड पर्यावरणासाठी का नसते? आपला परिसर, आपला निसर्ग याला ज्यावेळी आपण आपले घर मानू तेव्हाच हा निसर्ग आपल्याला आपल्या परिवारासारखा समजेल.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
28/09/2015 07:43 am

संकटकाळी रक्ताचे नाते असो वा नसो, माणुसकीचे नाते असणे महत्वाचे असते. अशा वेळी पैशाच्या राशी असून फायदा नसतो, तो योग्य तितका अन् योग्य ठिकाणीतो पैसा वापरायची बुद्धी लागते. फक्त शारीरीक शक्ती नव्हे तर मानसिक सहनशक्ती लागते. आणि यशाचा मार्ग मोकळा होतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
30/09/2015 07:55 am

काही लोक नेहमी आनंदी असतात, तर काही दुखी.
त्यांच्या या अवस्थेत आठवणी खुप महत्वाच्या असतात.
कारण जो फक्त दुख, कष्ट यांचा विचार करतो, त्याच्या भविष्यातही त्याचीच पुनरावृत्ती होते. पण जो आपल्या भुतकाळातील आनंद देणा-या गोष्टींचा वापर आज आनंदी राहण्यासाठी करू शकतो, तो पुढहीे आनंदी राहू शकतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
02/10/2015 06:21 am

मनुष्याचे विचार प्रगल्भ असतील तर त्याचे आचरण चांगलेच असते. पण असे विचार असण्यासाठी त्याचे सोबती, त्याची परिस्थिती आणि तसे विचार करण्याची सद्बुद्धी असावी लागते. तुम्हा सर्वांना ती लाभो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
05/10/2015 07:42 am

यश मिळवण्याची जिद्द सर्वांकडे असतेच असे नाही. पण अपयश पचवण्याची ताकद जरूर असते. फक्त ती ओळखण्याची गरज असते. आणि ज्या क्षणी अपयश स्विकारून पुन्हा प्रयत्न करणाची उमेद निर्माण होते, त्या क्षणी यश मिळवणे ही दुय्यम गोष्ट होते.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
07/10/2015 07:52 am

आत्मविश्वास आणि अतिविश्वास यांमधे फरक असतो. कारण आत्मविश्वासात यशस्वी होण्यासाठीची उमेद असते, तर अतिविश्वासात कधी अपयशी न होण्याचा समज. आता यांपैकी आपण काय निवडायचे हे जाणण्याचे काम ज्याचे त्याने करावे.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
09/10/2015 06:59 am

प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्टी घडवायच्या असतात अथवा त्या घडाव्या असे वाटत असते. पण त्या कितपत योग्य आहेत आणि त्यांचे परिणाम काय असतील याचा विचार फार कमी जण करतात. आधी विचार करा मग कार्य करा.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
12/10/2015 07:28 am

आपण आपल्या अकारण हट्टापायी असे कितीतरी पर्याय बंद करतो. इतरांना स्वतःच्या अपेक्षांच्या चौकटीत बसवण्यापेक्षा स्वतःच्या विचारांची चौकटच मोठी केली तर कित्येक प्रश्न सहज सुटतील.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
13/10/2015 07:38 am

फुलं साठवणं सोपं असतं पण त्याचा सुगंध आपल्याला मनातच साठवावे लागतात. तसचं सुखाचे क्षण हे क्षणिक असतात. त्याना टिकवून ठेवता येत नाही. पण मनात साठवून ठेवल्यावर तेही चिरतरूण राहतात आणि आपणही.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
14/10/2015 07:46 am

माणसं जपणं ही कला आहे. ती कला शिकवता येत नाही. जितकी जास्त माणसे तितके वेगवेगळे त्यांचे स्वभाव. आणि अशा वेगवेगळ्या स्वभावांना समजण्याची ताकद जो लवकर निर्माण करतो, तो माणूस जपायला शिकतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
17/10/2015 09:45 am

आनंदाच्या वाटा शोधणा-याला संकटांच्या अडथळ्यांची भिती कधीच वाटत नाही. ते फक्त प्रत्येक गोष्टीतील आनंद वेगळा करून त्याचा उपभोग घेतात. अशा आनंदाच्या क्षणांनी तुमचेही आयुष्य बहरून जावो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
19/10/2015 08:11 am

लहान मुलं असो वा मोठी माणसं जोपर्यंत खेळकर वृत्ती त्यांमध्ये असते तोवर कोणत्याही गोष्टीकडे तो स्वार्थ म्हणून पाहत नाही. पण ज्याक्षणी तो स्वतःचाच विचार करायला चालू करतो, तो नकळत स्वार्थी होऊ लागतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
20/10/2015 07:45 am

जिभेवर गोडवा, डोक्यात ज्ञान, मुखावर हास्य, दुस-यांचा मान या गोष्टी जो मिळवतो आणि त्याचा योग्य वापर करतो , तोच सुखाला गवसणी घालतो.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
21/10/2015 07:50 am

आपट्यांच्या पानांच सोनं वाटा अगर न वाटा, पण  सोन्यासारख्या मौल्यवान माणसांबरोबर सुखा-दुखाचे २ क्षण वाटले तर प्रत्येक दिवस म्हणजे आयुष्याचा दसरा होईल.
तुमचं हास्य हे सोन्याहून अधिक मौल्यवान आहे. हसत रहा.
दस-याच्या सोनेरी शुभेच्छा.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
22/10/2015 08:56 am

एखादी गोष्ट माणसाने तोपर्यंत करू नये जोपर्यंत ती तुमच्या स्वतःच्या मनाला पटतं नाही. आणि गोष्ट तेव्हाच पटते जेव्हा त्यातून काही चांगले किंवा वाईट घडत नाही. म्हणून चुकुन निर्णय घेण्यापेक्षा निर्णय घेऊन चुका. निदान काय करू नये हे ज्ञान तरी मिळेल.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
25/10/2015 09:37 am

फुलांचे रंग हे माणसांच्या स्वभावा सारखे असतात, झाडे बदलली की रंगसुद्धा आणि ढंगसुद्धा. पण ज्याचा दृष्टीकोन चांगला असेल त्याला त्या फुलांची सुंदरताच दिसते. इतर गोष्टी दुय्यम असतात. प्रत्येक माणसाच्या स्वभावात काहीतरी सुंदरता असते. पहाता आले पाहीजे.
- आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
26/10/2015 08:26 am

चांगली माणसं शोधुन सापडतील अस काहीच नाही. पण माणसांतील चांगले गुण शोधणं तितकं कठीण नाही. प्रत्येकाकडे पाहताना चांगले शिकण्याचा दृष्टीकोन ठेवा. जग किती सुंदर आहे हे कळेल.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
02/12/2015 07:58 am

कोणतीही गोष्ट तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त मिळत असेल तर ती दान करायला शिका. कारण ती दुस-याला आनंद, तुम्हाला समाधान आणि इतरांना आदर्श ठरते.
- आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
03/12/2015 07:58 am

माणसांना जोडून ठेवणारी एकच गोष्ट असते, प्रेम.
नातं कोणतंही असो, आई वडील असो, भाऊ बहीण असो, मित्र-मैत्रिण असो वा प्रियकर. प्रेमाचा ओलावा असेल तरंच ते टिकतं. म्हणून प्रेम करा.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
06/12/2015 07:59 am

निसर्ग जात, पात, धर्म, नाते इतकेच नव्हे तर पशु,पक्षी, सजीव, निर्जीव काही पाहत नाही. त्याचा कोप या सर्वांना नष्ट करतो. जर निसर्गच अशा गोष्टी पाळत नाही तर आपण माणसांनीच का भेदभाव पाळायचे? एकत्र येऊन निसर्ग जतन करायला शिका. तो वरदानच देईल.
आनंदी रहा. शुभ सकाळ. विक्रम वाडकर
07/12/2015 08:02 am

आपल्या हातात वेळ कधीच नसते. असते ती केवळ संधी. मिळालेल्या आयुष्यात वेळ कितीतरी संधी देत राहते. आपण स्वतः हे ठरवायचे कि कोणती संधी घ्यायची आणि कोणती सोडायची. तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने करा ही सदिच्छा.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
10/01/2016 09:05 am

स्वप्न आणि सत्य हे जरी वेगळे असले तरी आपण स्वप्न पाहणे सोडतो का? नाही. म्हणून स्वप्न सत्यात उतरवण्याचे प्रयत्न सोडू नका. या दोघांना एकत्र आणण्याचे काम आत्मविश्वास करतो.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
11/01/2016 07:37 am

वेळ बदलते, माणसे बदलतात, पिढी बदलते, इतकेच काय जग ही बदलते. बदलत नाहीत ते आपले विचार. बदलणा-या वेळेबरोबर आपण आणि आपले विचार प्रगल्भ करायला शिका. मग जगण्यात मजा येईल.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
12/01/2016 07:46 am

आयुष्य हे महासागरासारखे असते. ज्याप्रमाणे शुद्ध पाण्याच्या नद्या महासागरात मिळतात तसे घाण पाण्याचे ओढे अन् नाले ही. पण महासागर आपली ओळख संपवत नाही. म्हणून आयुष्य हे इतके मोठे असू द्या कि ४ क्षणांचे सुख वा दुःख त्यात निमीत्तमात्र असेल.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
13/01/2016 07:50 am

आपण आपले जिवन सुखात जगतो आहोत का याचे गणित सोडवायचे असेल तर दिवसात आपण किती वेळा हसतो याचा हिशोब काढा. आयुष्य हसण्यासाठी अन् हसविण्यासाठी आहे.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
14/01/2016 08:10 am

ज्याप्रमाणे सुर्याचे मकर राशीत संक्रमण होते आहे, त्याप्रमाणे तुमचा भाग्यरवी सुखाच्या राशीत प्रवेश करो अन् फलरूपी यश तुम्हाला मिळो ही सदिच्छा.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
15/01/2016 08:05 am

या स्पर्धेच्या युगात खुप स्पर्धा आहे. पण ती स्पर्धा इतरांशी नाही. आपली स्वतःशीच आहे. स्वतःवर ज्याने विजय मिळवला त्याला जगात मान मिळतोच. म्हणून ती स्पर्धा करा आणि जिंकून दाखवा.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
16/01/2016 09:57 am

माणसाने हसतमुख असायला हवे. कारण त्यामुळे समोर आलेले प्रश्न सुटत नसले तरी त्यांना सोडवण्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. म्हणून इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी हसत रहा.
आनंदी रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
17/01/2016 10:02 am

सोन्याचा खरेपणा पाहुन आपण ते खरेदी करतो. मग माणसांचा का नाही? समोरचा व्यक्ती खरा आहे हे न जाणता विश्वास ठेवतो. आणि मग विश्वासघात झाला असे मानतो. लक्षात ठेवा सोन्याचा खरेपणा पिवळ्या रंगावर नाही तर त्याच्या आतील गुणधर्मांवरुन कळतो.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
19/01/2016 08:32 am

स्वार्थ आणि अहंकार या वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी जोडलेल्या असतात. स्वार्थ म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी निर्माण झालेला हव्यास, लालसा. आणि अहंकार म्हणजे ती गोष्ट मिळवल्यावर मनात तयार झालेली गुर्मी. म्हणून स्वार्थ कमी केला कि अहंकाराला जागाच उरत नाही.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
20/01/2016 08:09 am

प्रत्येक स्त्री ही वेलांटीसारखी असते. लग्नाच्या आधी पिता तीला पत मानतो, तर लग्नानंतर पती. पण घराची पत ही त्या वेलांटीवाचून शुन्य असते. म्हणून तिचा आदर करा.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
22/01/2016 09:28 am

जर यश तुम्हाला हुलकावण्या देत असेल तर केलेले कष्ट वाया जात नाही. कारण एक घाव सोसून कधीच कोणता दगड देव होत नाही. म्हणून अपयशाचे १०० घाव सोसल्यावर मग मिळालेल्या यशाची प्रतिमेचा सगळेच आदर करतात.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
29/01/2016 07:22 am

तहानलेल्याला पाणी अन् भुकेल्याला घास दिल्याचे पुण्य हे सर्वात मोठे पुण्य असते. पाण्याचा योग्य वापर करून आणि अन्न वाया न घालवता प्रत्यक्षपणे नाही तर अप्रत्यक्षपणे हे पुण्य मिळवा.
- आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
विक्रम वाडकर
06/02/2016 07:53 am

खोट्या फुलांना खरा सुगंध कधीच येऊ शकत नाही. तसेच माणसांचे असते. वर वर खोटे भासवून जपलेली नाती कधीच गोड होऊ शकत नाही. प्रेम, नाती हे विश्वासाच्या ख-याखु-या सुवासानेच फुलते.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
07/02/2016 09:30 am

वेळ कधीच वाईट नसते. वाईट असतो तो काळ. ती परीस्थिती. त्या वेळेला आपण कस वागतो, कसे टिकतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. म्हणून वेळेचा उत्तम वापर करा.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
10/02/2016 09:29 am

एकमेकांवर अतुट विश्वास असणारी माणसे शरीराने दुर असली तरी मनाने अगदी जवळ असतात. कारण नात्यांना टिकवण्यासाठी गरज असते ती फक्त विश्वासाची. विश्वास ठेवा. आणि आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आदर करा.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
12/02/2016 07:50 am

कोणताही आजार शरीरावर जितका परिणाम करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मनावर करतो. ज्याक्षणी आपण मनातून त्या आजाराची भिती काढतो त्याक्षणी आजाराचा अर्धा प्रभाव निघून जातो. शरीराने आजारी असले तरी चालेल पण मनातून निरोगी रहा.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
17/02/2016 09:27 am

मनाप्रमाणे गोष्टी घडत असतील तर खुष राहणे सोपे जाते. पण खरी परिक्षा असते ती मनाविरूद्ध झालेल्या गोष्टींमध्ये गुंतून न राहता, सत्य स्विकारून, पुढे पाऊल ठेवण्यात. मन स्वच्छ असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला सहज पार करता येते.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
14/03/2016 07:31 am

जगात सर्वात बलवान कोणी असेल तर तो असतो स्वतःच्या मनावर संयम ठेवणारा व्यक्ती. संयम ठेवणे म्हणजे परिस्थितीचे भान ठेवून मनाच्या इच्छांवर स्वतःचा अंकुश ठेवणे. म्हणून कोणत्याही स्थितीत स्व वर नियंत्रण ठेवा. पुढे उत्तमच होते.
आनंदी रहा. हसत रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
18/03/2016 08:01 am

हसणारा चेहरा हा डॉक्टरांसारखा असतो. जसे डॉक्टर सोबत असले की आजारांची भिती वाटत नाही तसेच हास्य मुखावर असले की दुःखांचा लवलेष ही आपल्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच कदाचित असे म्हणतात की हसल्याने आयुष्य वाढते.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
19/03/2016 09:33 am

ऐकुन घेण्यासाठी कान हवे, पण समजून घेण्यासाठी भान हवे. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असली की भांडण-तंटे फक्त नामशेष उरतात. म्हणून समजूतदारपणा दाखवा.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
20/03/2016 10:17 am

दुस-यांना दिलेला मान हा सन्मानासहीतच आपल्याला परत मिळतो. आणि ज्याला ती किंमत समजते तो कधीही कोणाचे वाईट विचार करत नाही. कर भला तो हो भला.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
25/03/2016 07:58 am

हव्यास हाच माणसा माणसांतला शत्रू असतो. दुस-याने आपल्याहून चांगले केले की ते करण्याचा हव्यास, दुस-यांनी जे मिळवले ते मिळविण्याचा हव्यास, इतरांबरोबर केलेली तुलना या हव्यासाला जन्म देते. अन् माणूस माणसापासून दूर जातो
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
29/03/2016 07:59 am

'आपण असे केले तर लोक काय म्हणतील' ,'आपण तसे केले तर त्यांना काय वाटेल', 'हे नाही केले तर ते कसे वागतील' अशा अनेक कारणांचा आडोसा घेऊन अनेक जण स्वतःच्या इच्छा दाबून ठेवतात. इतरांना काय वाटेल हीच भिती सर्वात जास्त घातक असते. तुम्हाला इतरांना दोष देण्याचा अधिकार नाही. जबाबदारी स्विकारा. अन् मनाप्रमाणे वागा.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
31/03/2016 08:30 am

खरा देव हा कस्तुरीमृगाप्रमाणे प्रत्येक माणसात दडलेला असतो. तो देव शोधत आपण सगळीकडे हिंडतो. इतरांमध्ये देवपण शोधा. तुमच्यातला देव नकळत दिसून येईल.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
09/04/2016 09:16 am

जिवनाच्या गाडीला चार चाके असतात. आपण, आपले आई-वडील, मित्र परिवार आणि आपला जोडीदार. एकही निखळला तरी या प्रवासात अडथळे येतात. म्हणून प्रत्येक चाकाची काळजी घ्या.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
23/04/2016 08:48 am

ज्ञान हे अमृतासारखे असते. माणसाने त्याचा आदर करायला हवा. गर्व नाही. कारण ज्ञान डोक्यात आहे तोवर आपल्याला सावरते. पण डोक्यावर चढले की संकटात नेते.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
25/04/2016 08:40 am

कौतुकाचे २ शब्द हाच माणसाच्या मनाला पक्का आधार असतो. त्याला नाउमेदीपासून वाचवण्यासाठी, 'स्व'त्व जाणण्यासाठी, पुन्हा लढण्यासाठी. इतरांचे कौतुक करा. त्यांचे आयुष्य सावरू शकते.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
28/04/2016 08:31 am

सुर्यासारखे प्रखर तेज सर्वांनाच हवे असते, त्याच्यासारखेच नेहमी चमकत रहावे सा-यांनाच वाटत असते, पण त्या सुर्याच्या पोटात किती अग्नी जळतो तेव्हा तो सुर्य तळपतो. तुमच्या यशाचा सुर्य तळपण्यासाठी वाटेत येणा-या अडथळ्यांना अग्नी देण्याची ताकद तुम्हाला मिळो.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
29/04/16 06:48 AM

प्रत्येक प्रश्नांसाठी उत्तर मिळेलच असे नाही. पण त्यांना सामोरे जाण्याची सवय झाल्यावर प्रश्नांची चिंता कधीच राहत नाही.
मग प्रश्न बदलत राहतात. मग उत्तरे मिळतात किंवा पर्याय..
संकटांना सामोरे जा. विचार करण्याची पद्धत बदलेल.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
30/04/16 08:07

यशस्वी होण्यासाठी ध्येयपुर्तीची उमेद तेवत ठेवायची असते अन् डोके शांत. पण सामान्यतः माणसांची उमेद थंड पडते आणि डोके गरम होते. ज्याचे त्याचे हित स्वतः ठरवायचे.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
03/05/16 07:30 AM

ज्या क्षणी आपण स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्विकारायला आणि दुस-याच्या यशामध्ये आनंदी व्हायला शिकतो, त्याक्षणी आपण ख-या अर्थाने मोठे होतो.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
04/05/16 07:19 AM

माणूस जन्माला येताना पैसा, घर, गाडी, नोकरी, साथीदार यापैकी कोणतीही गोष्ट घेऊन येत नाही. तो फक्त एकच श्रीमंती घेऊन येतो. हे शरीर. आणि शेवटपर्यंत ही श्रीमंती जपण्यासाठीची धडपड करतो. जे करतो ते का करतो हे कळले तर जिवन सुरळीत राहते.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
07/05/16 09:29 AM

प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्वाची स्त्री म्हणजे आई. तुमच्या प्रत्येकाच्या आईला या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
08/05/16 09:23 AM

मनगटावरचे घड्याळ महाग असो वा स्वस्त, काम वेळ दाखवण्याचेच करते. कारण त्या काट्यांना फक्त पुढे सरकणे माहीत असते. माणसाचे आयुष्यही असेच असते. थोर असो वा लहान, पुढे सरकत राहायचे.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
11/05/16 08:09 AM

प्रत्येक गोष्टीला किंमत असते, काही पैशांमधे मोजता येतात तर काही भावनांमधे गुंफलेल्या असतात. पण प्रत्येकाला ते समजेल असे नाही. ती गोष्ट निघून गेल्यावर त्याचे खरे महत्व कळते. म्हणून वेळेच्या आधीच गोष्टी समजून घ्या.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
16/05/16 07:53 AM

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
18/05/16 08:20 AM

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा षड््रिपूंवर ज्या व्यक्तीला नियंत्रण ठेवता येते, ती व्यक्ती कोणताही निर्णय उत्तम प्रकारे घेऊ शकते. स्वतःला जाणून घ्या.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
20/05/16 08:20 AM

प्रत्येक माणुस हुशार असतो. जगाला हवा त्या बुद्धीवादी विषयात नसेल हुशार,पण त्याला आवडणारी गोष्ट खुप आवडीने करत असतो. कोणाच्या कमीपणावर हसू नका आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा गर्व करू नका.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
23/05/16 07:04 AM

कोणतीही गोष्ट घेताना आपण गोष्टीची पडताळणी करतोच, पण बनवणा-या मोठ्या कंपनीच्या नावाच्या भरोस्यावर घेतो.  निसर्ग नावाच्या कंपनीत माणुस नावाच जे उत्पादन वर्षानुवर्षे चालू आहे त्यांना ओळखायला मात्र खुप वेळ घेतो. कारण आपण फक्त चुका बघतो. माणुस ओळखायला शिका.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
31/05/16 07:54 AM

क्षणाक्षणाला वेळ नवनवीन परिस्थिती समोर आणते. आणि त्यांना सांभाळण्याचे तितकेच नवीन उपाय देखिल देते. आपण कितपत नियंत्रण ठेवू शकतो हे आपल्या आत्मविश्वासावर अवलंबून असते. स्वतःवर विश्वास असू द्या.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
12/06/16 08:37 AM

आकाशात जमलेले पावसाचे थेंब कोणाची तरी तहान भागवण्यासाठीच जमिनीवर येतात. पशुंची,पक्षांची,झाडांची, वस्तुंची आणि कोणाचीच नसेल तर या धरतीची. पण तहान भागवणं हे त्यांच काम. प्रत्येक माणूसही तसाच जगण्यासाठीच जन्म घेतो. मग आनंदी होऊन जगलेलं काय वाईट?
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
16/06/16 07:52 AM

पाऊस सुरू झाल्यावर हवेत आलेला गारवा अंग शहारतो. ती अनामिक ओढ पावसाची नसते तर आधी सोसलेल्या उन्हाच्या झळा मिटून जाव्यात ही असते. आनंदाचे प्रसंग ही तसेच असतात. सोसलेल्या दुःखांचे चीज झाल्याचा तो आनंद असतो. आणि आनंद हा वाटायचाच असतो.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
17/06/16 07:52 AM

अंगणातल्या म्हाता-या झालेल्या झाडांकडे फळांचा, फुलांची अपेक्षा कधीच करायची नसते. शांत आरामासाठी निव्वळ सावली मागायची असते. ते आशिर्वाद नवी उमेद देतात. म्हणून अशा झाडांची काळजी घ्यायची असते.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
18/06/16 08:05 AM

हवेची दिशा कोणालाही बदलता येत नाही, तरीही नाविकाला त्याचा किनारा कसा गाठायचा हे ज्ञात असते. त्याचप्रकारे ध्येय निश्चीत असेल तर अडथळ्यांची पर्वा न करता पुढे जात रहा. कधीतरी यशाचा किनारा गाठालच.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
06/07/16 07:51 AM

रोज रात्री अंधारात आपण डोळे बंद करून झोपतो कारण आपल्याला माहित असते कि डोळे उघडल्यावर जग प्रकाशमय असणार. एखाद्या संकटाशी सामना तसाच करायचा असतो. कारण कितीही अंधारमय संकट असले तरी आशेचा उजेड दिसायला रात्र पार करावीच लागते.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर

कोणतीही गोष्ट सत्यात उतरवण्याआधी त्या गोष्टीचे स्वप्न पहायचे असते. स्वप्नांशिवाय कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करणे म्हणजे जगायचे आहे म्हणून जगतोय असे असते.
स्वप्नं पहा. आणि ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.
हसत रहा. आनंदी रहा. शुभ सकाळ.
-विक्रम वाडकर
31/07/16 08:44 AM

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

सुविचार संग्रह १

चारोळ्या...