Posts

Showing posts from June, 2012

चारोळ्या...

पाऊस आणि मी कधीही बरसतो... मिलनाच्या ओढीने नकळत तरसतो...-- विक्रम वाडकर थेंब पडू लागले..अन हाक लागे श्रावणा... स्पर्श तुझा होता मनी ओल्याचिंब भावना...--विक्रम वाडकर मऊ मखमली तुझा स्पर्श हा, वेड लावतो माझ्या जिवा... शब्द वेडे मनात येती अन्, कसा सावरु माझी जिव्हा...--विक्रम वाडकर पाऊस धारांचा असो वा असो आठवणींचा... भिजवतोच तो मग उरतो ओला स्पर्श.. साठवणींचा...-- विक्रम वाडकर पावसाचे अन् माझे नाते जुने-पुराणे... माझ्या शब्दांना त्याच्या लयकारीचे गाणे...--विक्रम वाडकर सुईसारख्या बोचतात, कोसळणा-या सरी.. आठवणींच्या सुया.. असती माझ्या अंतरी..-- विक्रम वाडकर क्षण आहेत ओले सारे.. थोडा गोडवा अन् काही क्षार आहे त्यांना... वेचणा-या शब्दांना जरा जपून उचल...अजुनही धार आहे त्यांना...-- विक्रम वाडकर कधी कधी क्षणांना मोकळिक द्यावी आपण..फक्त आपल्यासाठी... मनातलं दुखः येऊ द्यावं आसवांतुन.. फक्त आपल्यासाठी...--विक्रम वाडकर. सर्व जणांमधे, खास आहे तु,   जागेपणी मिळणारा भास आहे तु, दुर ठेव तुजपासुन पण विसरु नको मजला.. माझ्या आयुष्याचा श्वास आहे तु-- विक्रम वाडकर विरह मांडु