Posts

Showing posts from October, 2015

कोणीतरी असायला हवं.

खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं.. मनापासून माझ्यासोबत, कोणीतरी हसायला हवं.. चिडवण्यासाठी मीही कधी थट्टा तिची करता.. रागावून कोणी रूसायला हवं.. कोणीतरी असायला हवं.. खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं.. एकट्याने विचार करताना..शांतपणा सांभाळून.. तिने बाजूला येऊन बसायला हवं.. कोणीतरी असायला हवं.. खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं.. दिवसभराच्या कामाने थकून भागून आल्यावर.. काळजीने कोणी पुसायला हवं.. कोणीतरी असायला हवं.. खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं.. आईच्या मायेचा वारसा तीने पुढे नेता नेता.. भिंतींसारखं घरामध्ये तीनेही वसायला हवं.. कोणीतरी असायला हवं.. खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं.. --विक्रम वाडकर 14/10/2015 12:25 am

आभाळ

क्षण मोहाचे चार.. येतील वारंवार.. कष्टी होऊ नको फार.. ऊतू आल्या भावनांना.. थोडं टाळ.. हळू सांभाळ.. तू तुझं आभाळ... हळू सांभाळ.. तू तुझं आभाळ... सावर रे, तुझ्या जुन्या नव्या सख्या सोबतींना.. तुझ्या सुखा-दुखामधील आठवणींना..सावर रे.. आवर रे, तुझ्या आत गोठलेल्या या मनाला.. तुझ्या आर्त त्या मुक्या-मुक्या क्षणाला..आवर रे.. वेळ निसटावी वाळू जशी मुठीतुनी.. तशा निसटत्या क्षणांना हळू हळू सांभाळ... हळू सांभाळ.. तू तुझं आभाळ... तुझी भरलेली ओंजळ, ज्यात सुखाचा परिमळ.. मांड मायेची हिरवळ, हात राहू दे सढळ.. सदा.. आशेचा श्वास जागू दे मनी तुझ्या.. तुझ्या जगण्याला, आकार आला, पुन्हा होणा-या चुका आता टाळ.. हळू सांभाळ.. तू तुझं आभाळ... हळू सांभाळ.. तू तुझं आभाळ... -विक्रम वाडकर 06/10/2015 05:31 pm