Posts

Showing posts from 2011

आणखी एक

चांदण्याची रात सरून , लख्ख उन्हे दारी आली, जुन्या अंगणातील तुळस आज, घरापासून दूर झाली. आजीच्या त्या गोष्टी आज, प्रत्येकाला bore झाल्या.. किंचाळलेली गाणी आता, once वाल्या more झाल्या.. शुभम करोति करण्यासाठी, वेळ कोणी काढत नाही, buffet मध्ये जेवणार्यांना, मायेने कोणी वाढत नाही ... चांदण्या रात्री झोपायाची, पद्धत कशी नाहीशी झाली, गादिवरच्या निजेसाठी, महागलेली A.C. झाली... कट्ट्यावरचे मित्र आता, फेसबुक वरती रमू लागले, रेशीमगाठी लग्नाच्याही, नेट वरतीच जमू लागले... आई आणि वडिलांची, माया तुम्ही विसरू नका. एकी तुमची शक्ती आहे, तीला वाटेत पसरू नका.... --- विक्रम वाडकर.

देणारा देऊन गेला, घेणारा घेउन गेला....

'विंदा'च्या आठवणी ताज्या राहतील यात काही शंका नाही, अशा महान कवी साठी लिहिलेली ही माझी आदरांजली..... देणारा देऊन गेला, घेणारा घेउन गेला...|| महाराष्ट्राच्या मायभूमीला काव्य रुपाची गंगा दिली.. तुकोबांच्या कवितेसम कला अशी अभंगा दिली..; साहित्याच्या भांडारात सुर दिले अन शब्द दिले... विचारांच्या सागराला नविन असे प्रारब्ध दिले...; भारताच्या इतिहासात एक कवी येउन गेला.. नक्षत्रांचे देणे मात्र न विसरता देऊन गेला..; देणारा देऊन गेला, घेणारा घेउन गेला... देता देता आज अचानक, आठवणी ठेवून गेला....|| ===विक्रम वाडकर===(२१.०३.१०) 'विंदा'ना आणि त्यांच्या कवितांना प्रणाम....

===तुकाराम ओंबले ===

रोजचीच ड्यूटी होती, साहेब पण आले होते... चेहरे सारे तेच होते पण आज मात्र घामानी ओले झाले होते.... तसे पोलिस म्हणून भरती झालो तेव्हा पासून...सवय होती... सवय... हे असे चेहरे बघायची... अन मग अनोलखी वागायाची... सवय... माहित नाही का, पण आज साहेब ज़रा जास्त चिंतेत दिसले... विचारल मी त्याना 'WHAT HAPPENED SIR?, काही चुकीचे झाले?' ते मला बोलले 'आज या मुंबई पोलिसांवर एक मोठी जबाबदारी आली आहे, ताज मधे आतंकाची रंगीत तालीम झाली आहे' ते उठले , माझ्याकडे वळले... बोलले 'आज कोणी दिड-दमड़ीचे शत्रु आमच्यावर वार करू पहातात, चला दाखवुया या महाराष्ट्राच्या...मुंबईच्या पोलिसांचा दनका... गाड़ी काढ़ा' साहेबांचे ते उदगार कानशील गरम करून गेले.... जणू कोणीतरी उकळत्या शिसाचा रस कानात ओतला आहे.... बस ...... आता आम्ही उठलो... आणि बसलो गाडीत... गाडी तड़क ताजच्या बाहेर पोहोचली .... साहेब उतरले ... अन मला म्हणाले 'तुकाराम, रक्ताचा थेम्ब अंगात जिवंत असेपर्यंत लढेन...पण जर मला काही झाल तर तू छातीचा कोट करून यांना बाहेर काढ...' मीही साहेबांना शब्द दिला.... लागलीच मला बोलावन आलं, सिनिअर ऑफिसर

===अजुन एक उनाड दिवस===

अजुन एक उनाड दिवस तुझ्याविना जगते आहे, तुझीच वाट बघते आहे... तुझीच वाट बघते आहे...!! रोज सकाळी तुला फ़ोन मी करायची, तुझा आवाजासाठी मी क्षण क्षण झुरायाची, देवाजवळ रोज मी तुझा नंबर मागते आहे......तुझीच वाट बघते आहे....|| आपण जिथे भेटायचो तिथे रोजच आता जाते, तुला आवडणारी गाणी मोठ्या-मोठ्याने गाते, माहीत नाही का पण अशीच आता वागते आहे.....तुझीच वाट बघते आहे....|| सोडून गेलास मला अर्ध्या वाटेवर सोडून, जगते आता आयुष्य कस-बस ओढून, आठवणीची कळ या मनात सारखी निघते आहे......तुझीच वाट बघते आहे....|| ===नामहीन===

===तुझी आठवण===

पाउस जेव्हा येतो तेव्हा, हिरवळ मनात दाटते, गवताच्या फांदीवरले दवबिंदु व्हावेसे वाटते, इतक्यात तुझी आठवण माझ्या मनी येते, डोळ्यांचा मेघ होतो अन् आसवेच फ़क्त देते ||धृ|| हृदय भरून आल्यावर एकच दृश्य दिसते, रक्तात भिजलेल्या प्रीतीची कट्यार काळजात घुसते, विसरणार तुला मी अस किती वेळा म्हणतो, आणि प्रत्येकवेळी तिचाच चेहरा डोळ्यासमोर आणतो||१|| कितीतरी जन बोलले तिचा असेल काही स्वार्थ, पण हे लक्षात न घेता मी प्रेम केल निस्वार्थ, काहीही न बोलता तू मला सोडून गेली, चेहरयाचे शब्द केले अन डोळ्यांची तलवार केली||२|| इतके वार सहन करून अजुन मी शांत आहे, तुझ्या प्रेमाचा सुगंध अजून माझ्या आसवांत आहे, दूर जा कितीही तू, माझा नेहमीच आर्शीवाद असेल, कधी मागे वलून पाहिलास तर नेहमी माझा हात दिसेल||३|| माझ्या मनाचा ताबा आता कोणी घेऊ नका, जरी हक्क असला तरी माझ्या आयुष्यात येऊ नका, माझी कविता वाचून तुम्ही एकच सल्ला घ्या, खरं प्रेम केलत तर शेवटपर्यंत साथ द्या||४|| =====विक्रम वाडकर=====

===आता तरी परत ये===

माझ्या मनाच्या जवळची ही एक कविता...... खुप दूर गेलीस तू , आता तरी परत ये, आणि मला कवेत घे ..... आपला पहिला दिवस भेटीचा मला नेहमीच आठवतो, तुझा मोहक चेहरा मला पुन्हा तिथे पाठवतो, डोळ्यात काजळ घालून नजरेने जख्मी केले होतेस, केसांवर गजरा मालून सुगंधाचे मारे केले होतेस, पुन्हा एकदा येउन अशीच मला त्या युगात ने.........|| मैत्री पक्की होण्याआधी तू मला भाषेच पुस्तक दिले होते, मनावर ताबा न ठेवता मीही 'I LOVE YOU' लिहिले होते, नवविची पहिली कविता म्हणुन वाचायची राहिली होती, कविता तर नाहीच वाचली ,पण मीच कोरले त्यावर ३ मोती, त्यावेळी आलेला राग पुन्हा तरी येऊ दे...........|| काही महिन्यानंतर मी विचार तुझा सोडून दिला, तेव्हा तूच तर येउन स्वतः मला propose केला, आनंदच आनंद देऊन दिलास आश्चर्याचा धक्का, शेवटपर्यंत निभावन्याचा विचार केलास पक्का, वाट पाहतोय त्याची अस माझ प्रेम हे.........|| काही दिवसांनी हे प्रकरण पालकांच्या ध्यानात आले, तू तर प्रेमावर ठाम होतीस मलाच पावुल मागे घ्यावे लागले, तुला नाही झाले सहन म्हणुन भलते-सलते केले होतेस, माझाच निर्णय चुकला वाटत? असे मला उमगले होते, माझी वेळ झाली

==पुन्हा 'टल्ली'==

टल्ली सर .... plz तुमचा नानू मला परत हवा आहे..... माफी असावी पण मी त्यासाठी कविता तयार देखिल केली आहे............ सर एकदाच ही कविता पाठवतोय, पुढे तुम्ही परत चालू करावी अशी इच्छा आहे..... डोळे अंधारून आले होते.. अंधुकसे नभ भरले होते.. फ़क्त आकाशाताच... स्पर्श जाणवत होता तो फ़क्त खारट.. थोडासा ओळखीचा थोडा अनोलखी. मी डोळे उघडले, ते अजुनही कोरडे होते ... जणू माझ्याच आयुष्यातील कोरडेपण सांगण्यासाठी... आणि पायही शाबूत होते, या स्वार्थी जगात थोडस अजुन रांगण्यासाठी... केसांमधे थोडीशी घाण चिकटली होती, चारित्र्यावर होती तशी... छातीमधे थोड पाणी भरल होतं, तेहि खारटच..... साला आयुष्यभर खारटच जगलो, आधी आई सोडून गेली म्हणुन , नंतर पपा 'टल्ली' झाले म्हणुन , रामभाऊनी तर तिखटपणा भरला ... त्यात बळी-राम चा तड़का, ताईचा संसार मोड़का, म्हणुनच हाती घ्यावा लागला वोडका.. साला सर्वच खारट.... पण आता नाही ... नाहीच. का मी जिवंत आहे अजुन ? या क्षणोक्षणी माझ्यावर थुंकी टाकणारया समुद्राला माझी दया का यावी ? का? त्याला माझी दया आली की त्याने मला परत पाठवलय ? माझ्या ताईची इच्छा पूर्ण करायला.. की ... की त्याची

=== भास ===

माझ्या डोळ्यात सखे, तुझाच तो भास आहे; दूर गेलीस तू तरीही, का तुझा सहवास आहे ? एकांत असताना कधीही, तुझीच स्मरणे मनी यायची , डोळीयांच्या छप्पराला मग आसवेच लगडायची, आजही माझ्या जगण्याला फ़क्त तुझा ध्यास आहे.......|| आजही गात्र माझे तुझ्यासाठीच झुरत असते , आठवनिंच्या ओझ्याखाली क्षण-क्षण मरत असते , शरीर जरी माझे असले तरी तिथे तुझाच निवास आहे.......|| रात्र आली की रोजच तो चंद्र मला बोलावतो , त्याला सोडून मी मात्र, माझ्या चंद्राकडे धावतो , आयुष्यरुपी वर्तुलाचा तूच तर व्यास आहे........|| अन्न गोड लागत नाही, ना रंगाची ओळख होई , निस्तब्ध मनाच्या वाटेवर मन हे भरकटत जाई , नशीबाने वाढून ठेवलेला किती मोठा घास आहे........|| ==============विक्रम वाडकर==============

===आयुष्य म्हणजे===

आयुष्य म्हणजे केळीचे पान ; आयुष्य म्हणजे हिरवे रान ; आयुष्य म्हणजे गार वारा ; आयुष्य म्हणजे पावसाच्या धारा ; आयुष्य म्हणजे जाळीदार खिड़की ; आयुष्य म्हणजे पाण्यातली बेडकी ; आयुष्य म्हणजे फुटलेली काच ; आयुष्य म्हणजे जगणे उगाच ; आयुष्य म्हणजे हसरी परी ; आयुष्य म्हणजे मोठी दरी ; आयुष्य म्हणजे समुद्राची लाट ; आयुष्य म्हणजे भिजरी पायवाट ; आयुष्य म्हणजे लताची गाणी ; आयुष्य म्हणजे देवाची वाणी ; आयुष्य म्हणजे भगवदगीता ; आयुष्य म्हणजे ही कविता ............ ====विक्रम वाडकर====

बघ सखे बाहेर येउन

बघ सखे बाहेर येउन , कसा चान्दन्याचा सडा पडलाय, पाऊल जरा जपून टाक , तुझ्या पायाजवळच तो अड़लाय|| रात्र धुंद झालिये चन्द्र भरात आलाय, फ़क्त तुझ्या आठवनिने , मोगरा ओला झालाय, आज तुझ्यासाठी सखे , मेघ सुद्धा रडलाय || ओल्याचिम्ब रस्त्यावर वारा गातोय गाने, झाडेसुद्धा सुरामधे हलवताहेत पाने, त्यांचा सुर माझ्या कालजाला भीड़लाय || तुझा चेहरा सुद्धा आज चंद्रासम दिसतोय, वाकून वाकून मी सारखा त्याच्याकडेच बघतोय, देवाने माझ्यासाठी असा चन्द्र धाड़लाय || निज आता तूही, मीही जातो झोपून, स्वप्नात भेटू पुन्हा, येतो जरा लपून, झोपेचाही आज योगायोगच घडलाय || =============विक्रम वाडकर============

किती दिवस झाले.....

ही कविता मी कोणाच्यातरी प्रेरणेतुन लिहिली आहे ....... आज माझ्या प्रेमाला वर्ष पूर्ण झालं ; काय सांगू तुम्हाला ... किती दिवस झाले मी तिचं तोंड नाही पाहिलं..!!!!!! जेव्हा पण भेटायची मला , तीच कालीज भरून यायच , तासन-तास आम्ही फ़क्त एकमेकांनाच पहायच, मग डोळ्यातील समुद्राला उधाण भरून यायच, डोळे सोडून-काठ मोडून ,अश्रु बनुन वहायच, खुप दिवस झाले ते पाणी नाही वाहिलं..||१|| माझी आठवण आली की ती मला फ़ोन करायची, मग माझ्या तोंडातील प्रत्येक शब्दासाठी झुरायची, बोलता बोलता अचानक हमसून रडायची, आणि मलाही स्वतःची भ्रांत पडायची, अजुन बोलायच होत जे दुःख मनात राहीलं..||२|| मला बघताना ती डोळे मिटून घ्यायची, का म्हणुन विचारल्यावर एकच उत्तर द्यायची, "तुला माझ्या डोळ्यामधे साठवून ठेवयाचय ", असं म्हणुन स्वतःच सैरभैर व्हायची, तिच्या आठवनिंनी मला खुप खुप त्राहिलं..||३|| तिच्या डोळ्यातील अधीरतेची कारण जेव्हा कळली, प्रत्येक अवघड कोड्याची उत्तरं तेव्हा जुळली, 'तुझी वाट बघेन , भेटू पुढच्या जन्मी ', असं बोलून तिची प्राण ज्योत मावळली, याच हातांनी महिन्यापूर्वी तीच शरीर दाहिलं..||४|| =========विक्रम व

--रातकिडा--

रातकीडा ...अहो रातकीडा किर किर करतो.... भीर भीर फिरतो.. तुसडेपनान जगुन मर मर मरतो....... हा रातकिडा.... मी माझ जगतो तुम्ही तुमच जगा... झाला जर अत्याचार कोणावर तर खिड़कीतुनच बघा... जगला तेवढ बस ,आता कोपर्यातच पडा..............अहो रातकिडा..... दिवस गप्प बसतो ,कालोखालाच दिसतो... स्वार्थी अशा दुनियेत राहुनच फसतो... त्याला सुद्धा तुम्ही माणसासारख गाडा...असा रातकिडा..... जिवंत होता तेव्हा कोणी नाही पाहिल... मेल्यावर सुद्धा त्याच दर्शन नाही जाहिल... कधीतरी अनोलखी माणसासाठी रडा... आहा रातकिडा..... कधी नाही कोणाला त्याची आठवण आली... किरकिरनार्या रातकिद्याला त्याचीच हुर-हुर झाली... राताकिद्याची हालत अशी, तर माणसाच तर सोडा....बघा रातकिडा.... ..हा रातकिडा...... ======विक्रम वाडकर=======

मरणही आमच्यावर रूसलय

आमच्या जीवनाच गणित कुठेतरी फ़सलय, काय सांगू आता, मरणही आमच्यावर रूसलय.|| उसवून उसवून जरी निष्काम झाले आधी, जगण्याचे धागे मात्र फाटले नाही कधी, इतकं सारं जगुन मी, दुखालाच पोसलय..||१|| आयुष्याच्या सारीपटावर प्यादाच बनाव लागल, काय सांगू तरी आमच पोट त्याच्यावरच भागल, प्याद्याला या माझ्या वजीरानेच त्रासलय..||२|| जगाने मला नेहमी बोटच दाखवले, त्याच बोटावर त्यांनी खुप खुप नाचावले, नाचून नाचून शरिराच कातड आमच घासलय..||३|| इतकं झालं तरी जगण सोडलं न्हवत, आयुष्यात कधी हसण सोडलं न्हवत, आता मात्र हे जगणच आमच नासलय..||४|| ==========विक्रम वाडकर(१.०९.०९)

दोन प्रेतं

एकदा दोन प्रेतं जळत होती सरनात, एक होत सागावर , एक होत चंदनात...||धृ|| सागावरल बोलल मी होतो शेतकरी, रक्ताच पानी करून रोज कष्ट करी, लाख संकट आली माझ्या आयुष्यवरी, नाही भ्यायालो त्यांना नाही बसलो घरी, चार दिवस सुखाचे मीही ग्रहण केले, पण ते अत्तराचे क्षण हातातून गेले, माझ्याच स्वप्नांना मी पिंजर्यात पाहिले, कष्ट करता करता मला जगयाचेच राहिले, आली नाही मजा या , जीवनरूपी मरनात......||१|| चंदनावरील प्रेत मात्र गप्प गप्प राहिल, सरनालाही त्याने अश्रुंच फूल वाहिल, मग हळूच काही शब्दात तेहि चोरून बोलल, श्रीमंतीच्या पड़द्यामगील पुस्तक त्याने खोलल, आयुष्यात त्याने खुप पैसा कमाविला, घर सोडून त्याने बाहेरच जीव रमविला, पण एकच दुःख त्याच्या अंत:मनात होतं, पैशाशिवाय आयुष्यात काहीच जास्त न्हवत, म्हणुन जीवन सोडून आलो मृत्युच्या शरनात........||२|| मग राख राख होउन दोघेही पाण्यात गेले, काय दूर गेलं आणि काय हाती उरले?, सागाने केले काय अन काय चंदनाने केले?, सरनाची राख करून त्यांना पानयाताच नेले, म्हणुन सांगतो तुम्हाला गरीब वा श्रीमंत, मृत्युनंतर असते सर्वांना एकच खंत, तत्पूर्वी करू स्वताचा दृष्टांत, संकट आली कि

माणुस आणि इच्छा (लेख)

माणुस आणि इच्छा जोडलेले असतात एका अनामिक धाग्याने , एका अवैध मार्गाने. का ते असतात चुम्बकासारखे, जेव्हा एकमेकांपासून दूर असतात ,तेव्हा खेचले जातात एका मुक्त शक्तिने. आणि जवळ आले की जातात पुन्हा दूर एकमेकांपासून. याच इच्छा प्रवृत्त करतात माणसाला , त्या पूर्ण करवून घेण्यासाठी , घट्ट धरण्यासाठी. पण मला हेच कळत नाही की का करतो माणुस इच्छा ?? ज्या पूर्ण होण्याची त्याला स्वथालाच नसते खात्री. आणि स्वतःच फिरवतो स्वतःच्या नशिबावर कात्री. असते त्याच्यात इतकी शक्ति की नशीबही बदलू शकेल तो, पण नाही करत प्रयत्न त्याचा. नाही करत तो काही त्याग काही कष्ट, आणि म्हनुनच नशीबही होते त्याच्यावर रुष्ट. पण कधी कधी असे काहीच होत नाही. कष्ट करणारा देखिल राहतो वंचित नशीबापासून. आणि नशीबदेखिल सारख देत राहत हुल्कावन्या. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर या इच्छा दगड बनुन असतात. आता त्या दगडाला देव मानून फ़क्त त्याची पूजा करत रहायची की त्याच्यावर मेहनत करून त्याची सुन्दर कलाकृती बनवायची हे सर्वस्वी माणसाच्या हातात आहे. म्हणुन मला एकच सल्ला द्यावासा वाटतो की, "करा इच्छा. करा इच्छा, इच्छा वाईट नाहीत ; पण करा

जेव्हा सुरुवात होते प्रेमाला...

एक झाडाच्या फांदीवर कळी आली जन्माला, ओल्या दवात न्हाऊनी धुंद केली मधुशाला, स्तब्ध होते नभ सारे, मुग्ध होती वसुंधरा, सुगंधाच्या घेउन लाटा उधाण आले सागराला, का घडले नकळत सगळे काहीच न्हवते कळले मला, कदाचित असेच होत असेल जेव्हा सुरुवात होते प्रेमाला||धृ|| रात्रीच्या अंधारात झोपेला निवारा मिळत नाही, जरी आली डुलकी तरी तिच्याशिवाय कोणी दिसत नाही, पहिला किरण सुर्याचा वाटतो एक दिवस पूर्ण, वर्ष सरावे एक जसे तसाच क्षणही वाटतो जीर्ण, डोक्यात असतो विचार एकच, पंख फूटतात मनाला ||१|| विचारांच्या वादलात एकच विषय असतो, सगळे चेहरे विरघलातात एकच चेहरा दिसतो, आनंदाचा पुर येतो जिथे दुःख हा शब्द नसतो, हे सगळे पाहून वाटते का माणुस प्रेमात पडतो? एखादा फसला जरी त्यामधे मदत करावी लागते जगाला||२|| हाक देते जेव्हा मन तुला, एकच साद ऐकू येते मला, "प्रेमात पडला आहेस तू", याच स्वप्नाचा झुलतो झुला, तुला तेच झाले आहे लोक म्हणतात 'प्रेम' ज्याला ||३|| --------------विक्रम वाडकर----------------

हे प्रेम कसं करावं?

प्रश्न आला एकदा समोर 'हे प्रेम कसं करावं?' , मजनू सारखं मरावं, की रोमियो सारखं झुरावं? || प्रेम असावं पान्यासारखं पारदर्शी असणारं , नितळ होउन कधी कधी आरशासाराखं दिसणारं , कधी वाटतं हेच पाणी मनामधेही मुरावं ||१|| प्रेम असावं रात्रीसारखं कालोखात दडलेल , काळ्या रंगाची चादर चांदण्यावर ओढ़लेल , अशा या रात्रीमधे चांदण्यातुनच फिरावं ||२|| प्रेमात व्हावं तारा जो रात्री चमकत राहतो , दिवस सुरु झाल्यावर मात्र इतरांत मिसलुन जातो , पुन्हा रात्र आल्यावर अधिक उजलुन पसरावं ||३|| प्रेमात व्हाव माणुस जे होन अवघड असतं , इतरांना समजुन घेउन विश्वासात ते बसतं , आनंद वाटुन घ्यावा ,दुःख क्षणात विसरावं ||४|| प्रेमात व्हावं झरा जो नेहमीच खाली पडतो , कितीही जोरात पडला तरी पाणी संथच सोडतो , त्याच्यासारखं अस्तित्व ठेवून आपणही कायम झरावं ||५|| कळल का तुम्हाला हे प्रेम असं करावं ........... --------------विक्रम वाडकर--------------

हे प्रेम असं असतं......

सांगतो आज तुम्हाला हे प्रेम कसं असत , दिसतं तसं नसतं हे प्रेम असं असत|| वचने देतात यात जी नंतर आठवत नाहीत, दोन क्षनांच प्रेम होत मग काहीच उरत नाही, यात शिरलं एकदा ,की नंतर अवघड असतं|| मुली घेतात करून ऐश म्हणे हा माझा बॉयफ्रेंड, २ दिवसानंतर 'बॉय' उरतो 'फ्रेंड' ला ती करते 'सेंड', सौंदर्य फ़क्त पाहिल तर नुकसान होत जास्त || मुलांचा तर विषयच सोडा मुले पक्की बदमाश, डोक्यात त्यांच्या शिजत असतो मुली अडकवन्याचा पाश, मुले ओलखा चांगली जे ओलखन सोप नसतं || प्रेमाच्या फंद्यात पडू नका त्याचा त्रास होतो सर्वांना, आपण सुखी असलो तरी टेंशन येत पालकाना, कळल नाही खरं प्रेम तर प्रेमातच हे जग फसतं|| प्रेम शरीराने होत नाही त्यात मनांच मिलन असतं, चाइनीज ची पार्टी दिली ,असं स्वागत त्याच नसतं , खरचं हीच किम्मत प्रेमाची ? काय प्रेम इतकं स्वस्त ?????? हे प्रेम असं असतं ...हे प्रेम असं असतं.............. ------------विक्रम वाडकर---------------

स्वातंत्र दिना निमित्त पोवाडा

हे राष्ट्र खरया मर्दाचे ......हे हे हे हे हे SSS, हे राष्ट्र खरया मर्दाचे , नाही परक्याचे ; नसे इथे कधी गुलामी बाज़ , (२) ना चले कोणाचाही माज , (२) जनतेचा असे हिंदवी राज ,(२) इथे आहे शुरांचा सहवास....... जी जी जी जी जी || सुरुवात केली 'बाबु' नी ,(२) आम्ही आहोत खुप अभिमानी ,(२) हे सांगितले ठाम मनानी ,(२) निषेध केला जीव त्यागुनी.......जी जी जी जी जी || आता टीलक म्हणाले हरी ,(२) स्वराज्याची वाजवली बासरी ,(२) मग काढला हिंद-केसरी ,(२) पावुल ना पड़े माघारी ........जी जी जी जी जी || भगतने मांडला घाट ,(२) लावू इग्रजांची आम्ही वाट ,(२) खजान्याची लावू विल्हेवाट ,(२) म्हणुन केला काकोरी कट ..........जी जी जी जी जी || हाक आली मर्द सुभाषी ,(२) 'खून दो फिर मिलेगी आझादी' ,(२) ही गोष्ट नाही आहे साधी ,(२) हे राष्ट्र आमचे आदी-अनादी ...........जी जी जी जी जी || बापूंनी केला इथे संग्राम ,(२) दिला सत्याग्रहाचा पैगाम ,(२) इंग्रजांना केला राम-राम ,(२) म्हणुन पूजला साबरमती धाम......जी जी जी जी जी || जी जी जी जी जी sssssssssssssssssss ..... -- विक्रम वाडकर --

प्रेम....

प्रेम म्हणजे वय विसरून जपलेल्या भावना.... प्रेम म्हणजे स्पर्श करून जाणलेल्या वेदना.... प्रेम म्हणजे रडताना आलेलं गालावरच हसू.... प्रेम म्हणजे मुद्दाम आणलेलं नाकारच रुसू.... प्रेम म्हणजे रागावलेला चेहरा पाहण्यासाठी केलेला उशीर.... प्रेम म्हणजे दुखावलेला मनाला दिलेला विश्वासाचा धीर... प्रेम म्हणजे दूर असणाऱ्या व्यक्तीला भेटण्याची आस.... प्रेम म्हणजे तिच्या मिठीत घेतलेला अखेरचा श्वास.... --विक्रम वाडकर