बघ सखे बाहेर येउन

बघ सखे बाहेर येउन , कसा चान्दन्याचा सडा पडलाय,
पाऊल जरा जपून टाक , तुझ्या पायाजवळच तो अड़लाय||

रात्र धुंद झालिये चन्द्र भरात आलाय,
फ़क्त तुझ्या आठवनिने , मोगरा ओला झालाय,
आज तुझ्यासाठी सखे , मेघ सुद्धा रडलाय ||

ओल्याचिम्ब रस्त्यावर वारा गातोय गाने,
झाडेसुद्धा सुरामधे हलवताहेत पाने,
त्यांचा सुर माझ्या कालजाला भीड़लाय ||

तुझा चेहरा सुद्धा आज चंद्रासम दिसतोय,
वाकून वाकून मी सारखा त्याच्याकडेच बघतोय,
देवाने माझ्यासाठी असा चन्द्र धाड़लाय ||

निज आता तूही, मीही जातो झोपून,
स्वप्नात भेटू पुन्हा, येतो जरा लपून,
झोपेचाही आज योगायोगच घडलाय ||
=============विक्रम वाडकर============

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १