==पुन्हा 'टल्ली'==


टल्ली सर .... plz तुमचा नानू मला परत हवा आहे.....
माफी असावी पण मी त्यासाठी कविता तयार देखिल केली आहे............
सर एकदाच ही कविता पाठवतोय, पुढे तुम्ही परत चालू करावी अशी इच्छा आहे.....


डोळे अंधारून आले होते..
अंधुकसे नभ भरले होते..
फ़क्त आकाशाताच...
स्पर्श जाणवत होता तो फ़क्त खारट..
थोडासा ओळखीचा
थोडा अनोलखी.

मी डोळे उघडले, ते अजुनही कोरडे होते ...
जणू माझ्याच आयुष्यातील कोरडेपण सांगण्यासाठी...
आणि पायही शाबूत होते,
या स्वार्थी जगात थोडस अजुन रांगण्यासाठी...
केसांमधे थोडीशी घाण चिकटली होती,
चारित्र्यावर होती तशी...
छातीमधे थोड पाणी भरल होतं,
तेहि खारटच.....
साला आयुष्यभर खारटच जगलो,
आधी आई सोडून गेली म्हणुन ,
नंतर पपा 'टल्ली' झाले म्हणुन ,
रामभाऊनी तर तिखटपणा भरला ...
त्यात बळी-राम चा तड़का,
ताईचा संसार मोड़का,
म्हणुनच हाती घ्यावा लागला वोडका..
साला सर्वच खारट....

पण आता नाही ...
नाहीच.
का मी जिवंत आहे अजुन ?
या क्षणोक्षणी माझ्यावर थुंकी टाकणारया समुद्राला माझी दया का यावी ?
का?
त्याला माझी दया आली की त्याने मला परत पाठवलय ?
माझ्या ताईची इच्छा पूर्ण करायला..
की ...
की त्याची तहान भागली ताईच्या आत्म्याने,
माझं शरीर आणि त्यावरचे ते अदृश्य व्रण त्याला पचवता नाही आले म्हणुन ?

असो....
आता मी जिवंत आहे..
एक प्राण आहे..
एक ध्यान आहे..
आणि आता मला स्वतःच भान आहे ....
आलोय मी पुन्हा नवीन जन्म घेउन...
ताईसाठी ...
आलाय पुन्हा 'टल्ली'...
पुन्हा 'टल्ली'.........

===विक्रम वाडकर===

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १