=== भास ===

माझ्या डोळ्यात सखे, तुझाच तो भास आहे;
दूर गेलीस तू तरीही, का तुझा सहवास आहे ?

एकांत असताना कधीही, तुझीच स्मरणे मनी यायची ,
डोळीयांच्या छप्पराला मग आसवेच लगडायची,
आजही माझ्या जगण्याला फ़क्त तुझा ध्यास आहे.......||

आजही गात्र माझे तुझ्यासाठीच झुरत असते ,
आठवनिंच्या ओझ्याखाली क्षण-क्षण मरत असते ,
शरीर जरी माझे असले तरी तिथे तुझाच निवास आहे.......||

रात्र आली की रोजच तो चंद्र मला बोलावतो ,
त्याला सोडून मी मात्र, माझ्या चंद्राकडे धावतो ,
आयुष्यरुपी वर्तुलाचा तूच तर व्यास आहे........||

अन्न गोड लागत नाही, ना रंगाची ओळख होई ,
निस्तब्ध मनाच्या वाटेवर मन हे भरकटत जाई ,
नशीबाने वाढून ठेवलेला किती मोठा घास आहे........||

==============विक्रम वाडकर==============

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १