मरणही आमच्यावर रूसलय

आमच्या जीवनाच गणित कुठेतरी फ़सलय,
काय सांगू आता, मरणही आमच्यावर रूसलय.||

उसवून उसवून जरी निष्काम झाले आधी,
जगण्याचे धागे मात्र फाटले नाही कधी,
इतकं सारं जगुन मी, दुखालाच पोसलय..||१||

आयुष्याच्या सारीपटावर प्यादाच बनाव लागल,
काय सांगू तरी आमच पोट त्याच्यावरच भागल,
प्याद्याला या माझ्या वजीरानेच त्रासलय..||२||

जगाने मला नेहमी बोटच दाखवले,
त्याच बोटावर त्यांनी खुप खुप नाचावले,
नाचून नाचून शरिराच कातड आमच घासलय..||३||

इतकं झालं तरी जगण सोडलं न्हवत,
आयुष्यात कधी हसण सोडलं न्हवत,
आता मात्र हे जगणच आमच नासलय..||४||
==========विक्रम वाडकर(१.०९.०९)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १