Posts

Showing posts from April, 2015

ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब..

ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब.. रब की नेमत है..जो तु है करिब़.. तेरी आगोश मे है जन्नत मेरी.. ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब.. तेरी वो मिठी मिठी बाते... यादो मे कटी वो लंबी लंबी राते... सरगोशी से कहे हवा..ओ रहनुमा.. ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब.. शरम से बोझ़ल तेरी पलके.. जिनमे छुपे है राज़ कल के.. तुझसे जुडा है मेरा कारवाँ..ओ रहनुमा.. ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब.. तुझसे इश्क करने का किया है गुनाह.. तेरे दिल के कोने मे देदो अब पनाह.. तु ही खुदा, तु ही जहाँ..ओ रहनुमा.. ओ रहनुमा.. मेरे जहऩसीब.. -विक्रम वाडकर ३०-एप्रिल-२०१५

तु नसताना तु असण्याची

अजुनही ओठांवरी.. नाव तुझे रेंगाळते.. श्वासात या गंधाळते.. तुझे उष्ण उसासे.. तु नसताना तु असण्याची चाहूल का मज भासे.. ओलावल्या माझ्या मनाचे.. ओलावल्या पापण्यांचे..एक झाले मागणे.. जिवलगा ये परतुनी... हेच आता सांगणे.. तु नसताना तु असण्याची चाहूल का मज भासे.. माझ्या बटांशी तुझे खेळणे.. विसरू कशी सांग ना.. तुझ्या माझ्या त्या चुका.. भुलवू कशी सांग ना.. अस्तित्वाच्या सारीपाटाचे..बदलले सारे फासे.. तु नसताना तु असण्याची चाहूल का मज भासे.. -विक्रम वाडकर 25/04/2015 08:17 pm

तुझ्या खुल्या बटांची..

तुझ्या खुल्या बटांची.. रेंगाळणारी काळी.. गालांवरील लाली.. जिव माझा जाळी.. ओठांची गुलाबी.. पाकळी कोवळी.. रस भरल्या जिभेची.. गोडी जणू सोवळी.. डोळे तुझे नशिले.. मदभरे करून गेली.. कवेत हवा विसावा.. ही आस मनी आली... पापण्यांचे हळूच झुकणे.. अन् प्रश्न तुझ्या भाळी.. प्रेमाच्या या मळ्याचा.. बनशील का रे माळी.?? ---विक्रम वाडकर.22/04/2015 12:01 am

Love-story

थोडी दिवानी.. थोडी थोडी रूहानी.. कुछ़ ऐसी कहानी.. दिल कहे.. मेरे ज़ह़न मे.. बुंदो की अंजुमन मे.. कुछ़ नशिले सावन मे.. दिल कहे.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. Love-story .. तेरी मेरी.. हुई शुरू..(x२) हवा है महकी महकी.. और मै भी थोडी बहकी.. बारीशों मे.. गिला गिला ये बदन.. भिगा है तन-मन.. बारीशों मे.. बारीशों कि साजिशों मे.. बह गयी हूँ मै और तू.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. Love-story.. तेरी मेरी.. हुई शुरू..(x२) हाथ तेरा मेरे हाथ.. चल चलेंगे साथ साथ.. मंजिलो तक.. फिर खुशी मिले या गम.. रंहेंगे हम दम.. मंजिलो तक.. मंजिलो कि रंजिशो मे.. गुम हुई हूँ मै और तू.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. तु रु तु रु.. Love-story.. तेरी मेरी.. हुई शुरू..(x२) -- विक्रम वाडकर (१५-एप्रिल-१५)

दास्तां...

खुषनुमां सी थी जो जिंदगी ... रौनके तुझसे थी जगी.. बेजुबां सा जो ये कारवाँ.. अश्को से करतीे बयाँ,दास्ताँ.. पलके यहाँ.. दर्द का है सिलसिला.. तेरी यांदो से मिला.. सासो से सासो का ये रिश्ता.. खो रहा.. अश्को से करतीे बयाँ,दास्ताँ.. पलके यहाँ.. अंजुमन मे रहती थी.. जो छंवी.. दोज़ख़ भरी नजरों मे.. जल रही.. रूह मेरी जिस्म से कहे.. कर दे रिहाँ.. अश्को से करतीे बयाँ,दास्ताँ.. पलके यहाँ.. - विक्रम वाडकर (१५-एप्रिल-१५)

राग

राग 'भैरवा' प्रातःकाले.. भक्ती वसे तित बंदिश ल्याले.. सखा 'जोगिया' 'विभास' बोली.. 'रामकली' ने प्रभात झाली.. रिषभ कोमले 'आसावरी'.. 'हिंदोल','तोडी' सकाळ करी.. 'जौनपुरी'चे माधुर्याने.. रूणझुणले अन् रमले गाणे.. तृतिय प्रहरी स्वर 'सारंग'.. कानी पडता श्रोता दंग.. 'भीमपलासी'अन् 'मुलतानी'.. संध्येलागे गावी 'धानी'.. 'पुरीया धनाश्री' करूणाकारी.. 'यमन' 'कल्याण' मिठास धारी.. रात्रौ होता 'जयजयवंती'.. आळविता तया पडते भ्रांती.. उत्तररात्री 'मालकंस' तो.. निशेसोबती कुशीत घेतो.. सांगितलेली विक्रमवाणी.. स्वरगंगेचे थोडे पाणी.. --विक्रम वाडकर ५-एप्रिल-१५

होऊ कसा मी तुझा

ओलावल्या मातीचा सुवास हा.. बेधुंद कुंद श्वास हा.. आभास हा.. तुझा. होऊ कसा मी तुझा.. राणी.. होऊ कसा मी तुझा .. गहिवरल्या भावनांत तु.. तु नवी चेतना.. बोलु कशा सांगू कशा.. मुक्या या संवेदना.. लागला का ध्यास हा.. तुझा.. राणी.. होऊ कसा मी तुझा.. शुष्क वाटे जग सारे.. सोबती नसतेस तु.. अधीर तुही भेटण्यासी.. कारणे रचतेस तु.. मोहतो का पाश हा.. तुझा.. राणी.. होऊ कसा मी तुझा.. -विक्रम वाडकर ३१-मार्च-२०१५

शाळेचे गेट

शाळेसमोरच्या वाळुवरती, आठवणींच्या पाऊलखुणा.. मित्र-मैत्रीणींच्या पारव्यांचे, थवे इथे आले पुन्हा.. बाकावरल्या गप्पा-गोष्टी, रंगल्या आता कट्ट्यावरती.. किस्से काही जुने पुराणे, वय विसरुनी लहान करती.. लहानपणीच्या खोड्या-मोड्या, हसवू लागल्या आज आता.. तेच आयुष्य सुंदर होते, सांगू लागल्या नव्या कथा.. कितीही मोठे झालो तरी, शाळेसाठी लहान होऊ.. वेळामधून काढून वेळ, दोस्तांसाठी राखून ठेऊ.. दरवर्षी एक दिवस, होऊ दे अशीच गाठ-भेट.. पुन्हा एकदा भरून जाऊदे, मैत्रीने फुललेले शाळेचे गेट ... -विक्रम वाडकर (०३-०३-२०१५ )

माणुस

माणसाच्या 'मी'पणाला स्वार्थाचा चहाळा, माणुसकीला लावलाहे, कायमचा टाळा.. रस्त्यावरल्या दगडाला बनवतो देव, गरीबाच्या गरीबीची फक्त करी किव.. तोकडे कपडे तसे विचार तोकडे, इभ्रतीच्यासाठी मग नभाशी साकडे.. पैसा पैसा करी इथे सोडतो ना कोणी, खातो परी मरणा-याच्या टाळूवरले लोणी.. टिप देतो जिथे, अशा हॉटेलात खात, दिसती ना अशा वेळी भिका-याचे हात.. कुठेतरी जेवणाचे पाट-पाट वाहे, भुकेपरी मरणा-यांचा गुन्हा काय आहे.. माणुस म्हणून जगतो हे विसरले सारे, मनामधे लपलेला माणुस शोधा रे.. मनामधे लपलेला माणुस शोधा रे.. -विक्रम वाडकर(२०-मार्च-२०१५)

नकळत ओलावल्या

मनमनीचे घाव गोठले, उरी उसळले, भाव पेटले.. साठवू कुठे मी वेदना.. नकळत ओलावल्या पुन्हा.. या पापण्या.. आस ही सलते मनी, भास होतो ज्या क्षणी.. तोडले का तु, सांग ना.. या बंधना.. नकळत ओलावल्या पुन्हा.. या पापण्या.. जळती हे धागे जुळलेले, पिळ तरी मागे का उरलेले.. तुझ्यासाठी दिलेल्या जान ना.. या स्पंदना.. नकळत ओलावल्या पुन्हा.. या पापण्या.. -विक्रम वाडकर २३-मार्च-२०१५