होऊ कसा मी तुझा

ओलावल्या मातीचा सुवास हा..
बेधुंद कुंद श्वास हा.. आभास हा.. तुझा.
होऊ कसा मी तुझा.. राणी..
होऊ कसा मी तुझा..

गहिवरल्या भावनांत तु.. तु नवी चेतना..
बोलु कशा सांगू कशा.. मुक्या या संवेदना..
लागला का ध्यास हा.. तुझा.. राणी..
होऊ कसा मी तुझा..

शुष्क वाटे जग सारे.. सोबती नसतेस तु..
अधीर तुही भेटण्यासी.. कारणे रचतेस तु..
मोहतो का पाश हा.. तुझा.. राणी..
होऊ कसा मी तुझा..
-विक्रम वाडकर ३१-मार्च-२०१५

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १