नकळत ओलावल्या


मनमनीचे घाव गोठले,
उरी उसळले, भाव पेटले..
साठवू कुठे मी वेदना..
नकळत ओलावल्या पुन्हा.. या पापण्या..

आस ही सलते मनी,
भास होतो ज्या क्षणी..
तोडले का तु, सांग ना.. या बंधना..
नकळत ओलावल्या पुन्हा.. या पापण्या..

जळती हे धागे जुळलेले,
पिळ तरी मागे का उरलेले..
तुझ्यासाठी दिलेल्या जान ना.. या स्पंदना..
नकळत ओलावल्या पुन्हा.. या पापण्या..

-विक्रम वाडकर २३-मार्च-२०१५

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १