Posts

Feb-2020

शब्द तुझे सुर्य अन् पोळलेले मन माझे.. पाठमोर्‍या कांकणाला लागले ग्रहण ताजे.. - विक्रम वाडकर 02-feb-20 कुछ नकाब है छुपे तेरे हुस्न के नीचे.. ख्वाब की ताबीर करे भी तो किससे???..  -विक्रम वाडकर 02-feb-20 झाकोळल्या आठवणींचा नयनात पूर आला...  जन्मे सरून गेली तीत क्षण आतुर झाला...  - विक्रम वाडकर 03-feb-20 रुह-ए-इश्क मे इत्तर सी महक रही हो.. महजबीन से अब तुम जहनसीब बन गयी हो... - विक्रम वाडकर 08-feb-20

परी

इवल्या इवल्या पावलानी परी आली अंगणात , २ जन्म होतात आपले, हे कळले त्या क्षणात.. क्षीण कितीही आला तरी विसरून जातो आपण, बाळाच्या बंद डोळ्या मध्ये हरवून जात मन.. हातभर जिवाचा त्या कल्ला असतो फार, आपल्याला मात्र तोही, सुरेल वाटतो  यार.. नाजूक अशा पंज्याने जेव्हा पकड होते घट्ट, गहिवरून येते आतून जसा काळोख होतो मिट्ट.. बोबड्या बोबड्या शब्दांची जिभेला झाली सवय, तिला बघून वाटत, कशाला दुसर बालपण हवय.. शांत झोपेत असली तरी हास्य असत ओठी, इथून पुढच आयुष्य जगेन फक्त तुझ्याचसाठी... - विक्रम वाडकर

भोले

समय करे जो यहा वो बोले.. गले मे उनके शेष जो डोले.. आंखो मे भर के मौत के शोले.. एक हुंकार जो भम भम् भोले.. तुम्ही हो कारण, तुम्ही हो हारण.. जीवन दुःख मे तुम्ही हो पारण.. विष का प्याला पिये अमर वो.. नेत्र तिसरा खुले कहर हो... जटा हार मे गंगा विराजे... नील कंठ पे भस्म ही साजे... रौद्रावतार का सूक्ष्म रूप है... तीनो लोक का एक भूप है... धरती के कंकर मे समा है... तेरी सांस से अंबर की हवा है... अर्धनारी होकर भी नर है... शक्तीधारी तूही शंकर है.. सभी लोक के द्वार तू खोले... एक हुंकार जो भम भम् भोले... महादेव हर हर भ म् भोले... महादेव हर हर भ म् भोले... महादेव हर हर भ म् भोले... -  विक्रम वाडकर  2019/03/04 11:54

वंदे मातरम्

फिर आये है लोग यहा पर सिने पे तिरंगा लगाके, सफेद रंग के कपडे पेहनकर १ दिन का देशप्रेम जगाके... दिन रात से खडे है जो सरहद्द पर वो वीर जवान.. वही तो सारे बचा रहे है, देश हमारा हिंदुस्थान.. उन जवानो का सिना जब खाता है गोली गोली.. तब जाकर हम पाते है, ईद, मुहरम, दिवाली.. कुछ बेटे देकर भी मा जब अपना देश बचाती है.. पता नहीं है ये हिम्मत वो किस भगवान से पाती है.. गीरा रहे है रोज वहा..मिट्टी पर जो लाल लहू.. याद मे उनके तडप रहे है.. मा,पत्नी,बेटी,बहू.. सो रहे हम रातो को सुख चैन के सपने लिये.. मौत गले लगाते है वो ताकीं उनके अपने जीए.. तिरंगे मे है ३ रंग ये गलत सीख रहे है हम.. चौथे लाल रंग बिना, कैसे कहे वंदे मातरम् ..... विक्रम वाडकर

चहा आणि आठवण

उकळणाऱ्या चहासोबत आठवणींची गरमागरम वाफ चेहऱ्यावर आली...  मग खऱ्या खोट्याच्या स्वच्छ चाळणीतून आठवणींची धार मनाच्या कपमध्ये भरली.. चहाचा कप घेऊन शांत पणे खिडकीजवळ जाऊन बसलो.. पहिल्या झुरक्याबरोबर जिभेला चटका बसावा अशा काही आठवणी चटका लावून गेल्या.. मग हळू हळू त्या चहाची ऊब ओठातून पोटात, पोटातून शरीराच्या रोमरोमात ऊर्जा देऊ लागली.. मग खरेच आयुष्यात आपण जे काही चांगले केले त्याचे हिशोब चालू झाले.. ज्यांनी जीवनात चांगले वागण्याचे संस्कार दिले त्या आई बाबांची, ज्यांनी चांगल्या वाईट परिस्थितीत साथ दिली त्या मायाळू मित्रांची,खोड्या काढत आनंद शिकवणाऱ्या बहिणीची, मी आहे तसा माझा स्वीकार करणाऱ्या माझ्या सहचारिणी ची, आणि काहीवेळा अनोळखी असून माझ्यातील चांगुलपणा जाणवून देणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तींची आर्ततेने आणि ऋणी भावाने आठवण आली.. कधी आपल्याच वागण्याचा राग यावा अशा क्षणांनी मनात चीड वाटली.. कधी इतरांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींनी मन उदास झाले.. पण मग विचार आला. सगळं चांगलं घडत असेल तर वाईट उरणारच नाही. आणि वाईट नसेल तर चांगुलपणा काय असतो हे कळणारच नाही. पण आपल्या जगण्याचं पारडं चांगल्याकडे

बहीण...

सासरी जाणारी बहीण हा चटका लावणारा प्रसंग असतो. त्याची कल्पना करून सुद्धा डोळे भरून येतात. कंठ दाटून येतो. जश्या आई वडिलांच्या आपल्या पोरीसाठी भावना उफाळून येतात, तश्याच भावाच्या मनातही असतात..  काहीशा अल्लड.. काहीश्या अवखळ..  काही उनाड.. काही जीवापाड..काही खळखळलेल्या.. काही घुसमटलेल्या.. तशाच काही भावना.. माझ्या मनातल्या.. लहानपणी तुला उचलून घेऊन फिरायचो, आज सुद्धा मी तेच केलं.. कुठेही जाताना तुला हात पकडुन न्यायचो,आज सुद्धा मी तेच केलं.. छोटी भांडी खेळता खेळता तू खूप मोठी झाली.. छोटी खेळणी सांभाळणारी मोठा संसार थाटायला निघालीस.. मला घेतलेली गोष्ट तुला मिळेपर्यंत रडायचीस.. तुझी वस्तू घेतली की खूप खूप चिडायचीस.. आता तुझ चिडण माझ्यासाठी नसेल.. त्याच मात्र दुःख माझ्या मनात असेल.. हट्टी होती तू जी सारखी मागे लागायची..  नको नको बोललं तरी तुझच तू वागायची.. लाड करायचे सारे कारण तू गोड होती.. प्रत्येक खोडीत तुझ्या, माझीही तुला जोड होती.. गोष्टी समजावून सांगायला मला कधीच जमलं नाही.. पण तुझ्या बोलण्याने तूच सगळ्यांच्या मनात राही.. आजपर्यंत मी तुझ्याशी खूप भांडलो असेन..मात्र.. इथून पुढे इतरांश

हरी पांडूरंग हरी..

मुखात अभंग, हातात मृदुंग, हरिनामी होतो आम्ही तल्लीन.. गळयामध्ये टाळ, तुळशीहार माळ, तुझ्या नामानेही उडतो हा क्षीण.. मायबाप जगताचा या, उभा विटेवरी... चंद्रभागा गंगा अमुची, स्वर्ग ही पंढरी... नाम घोषाने दुमदुमली वैकुंठ नगरी.. हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... हरिजन सारे मागती हे दान.. माऊलींच्या चरणी लागो तन - मन - ध्यान.. वारकरी असता कोणी, थोर नाही सान... विष्णुमय झाली, आज माऊलींची वारी.. नाम घोषाने दुमदुमली वैकुंठ नगरी.. हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... हाती असे वीणा, कुठे डोईवर तुळस... भेटीलागे पंढरपुरा, येईना आळस... सुखावून जाती सारे, पाहुनी कळस... भान देहाचे सोडूनी, नाचे वारकरी.. नाम घोषाने दुमदुमली वैकुंठ नगरी.. हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... सार्थ विठ्ठल ..आर्त विठ्ठल.. सत्य विठ्ठल.. अर्थ विठ्ठल.. रंग विठ्ठल.. संग विठ्ठल.. आत्म विठ्ठल.. सत्व विठ्ठल.. राम विठ्ठल.. श्याम विठ्ठल.. देह विठ्ठल.. धाम विठ्ठल.. काम विठ्ठल.. नाम विठ्ठल.. हरी विठ्ठल.. हरी विठ्ठल.. हरी विठ्ठल.. हरी विठ्ठल.. - विक्रम वाडकर  2