Posts

Showing posts from 2010

===प्रेमाचा अभंग===

चिमुकल्या जीवा | लागलासी ध्यास | भोगिला संन्यास | तुजसाठी || रूप पाहुनिया | विसरलो भान | लावियले मन | भक्तिमधे || पाहता तिजकडे | फिटला संदेह | आपुलासा देह | राहवेना || स्पर्श तिचा होता | पेटतसे आग | पाहुनिया राग | मरतसे मी || इच्छा असो हेची | तिचे लाभों दान | जाईन शरण | कोणासही || समजुनी घ्यावा | माझा कविरंग | करितसे अभंग | 'विक्रम'ही || --------------------विक्रम वाडकर----------------------

===मी मुंबईकर===

लोकलची खडखड, काळजाची धडधड, तोंडाच्या घासला पैशाची परवड....... गुंडाचा राडा, पोलिसांच्या धाड़ा, सामान्य माणसाला, बाराचा पाढा...... मराठ्याची गाय, भैयांचा व्यवसाय, त्यांच्या दुधाला मात्र, पैशाची साय...... सणाचे दिवस, अनवाणी नवस, दिसेनाशी झाली आता, अंगानातली तुळस...... नेत्यांची निती, दंगालींची भीती, खुर्चीच्या नादाने, सडली राजनिती....... मुलांचे लाड, फैशनच फैड, आई-बाबा गेले, उरले मॉम-डैड....... पावसाच्या धारा, किंवा ग्रिष्माचा वारा, हाय-अलर्ट नेहमी,येती अंगावर शहारा....... परकियांना दाणा, अन स्वकियांना वहाणा, इंग्रजी अन हिंदीपाई, विकला मराठी बाणा?...... देशासाठी मेले, महाराष्ट्राचे चेले, आमच्या पदरी आले फ़क्त, आतंकाचे हल्ले....... आम्हा नाही डर, जोवर शाबूत आहे घर; जगण्याचीही उमेद देई, हा मुंबईकर......|| ===विक्रम वाडकर===

===लोकधारा-२===

मथुरेच्या गवळणी,या मथुरेच्या गवळणी.... घेउनी माठ, चालुनी ताठ, उतरुनी घाट.... आल्या साजनी...मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी.....|| आला मग कान्हा, घेउनी गणा, मोहिसी भाना..... शुभ्र या दिनी.....मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी...|| पाहती सखी, दर्शनी मुखी, नयन केतकी, तो चक्रपाणी...मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी.....|| फेकिला खडा, फोड़ीले घडा, पाडती सडा, पाहुनी लोणी....मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी......|| सख्या तरी शांत, नसे जणू भ्रांत, वाटे एकांत, तयांच्या मनी...मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी....|| झाल्या या ऋणी, अशा मथुरेच्या गवळणी........||| ===विक्रम वाडकर===

==लोकधारा-1==

वाजी पैजनाचा ताल, दुनिया झाली हो बेहाल; फसली भल्यांचीही चाल, कशी इथं ...|| बांधी यौवनाचा पुल, त्याशी नर्तकीची झूल; बाया-बापडयाची हूल, अन नथ ...|| टच्च भरदारी काया, पड़े इन्द्रपुरी पाया; नमन पहिल गणराया, धुंद दिशा ...|| नृत्य-लावण्याची लाट, लोक पडत्याती चाट; उभं अंगावर काटं, ह्यो तमाशा ...||

माई - सिंधुताई सपकाळ

विदर्भात जनमली अशी एक बाई , जिच्या नशिबाला होती भलतीच घाई ; मूर्तिमंत ठरली अशी आमची माई , नाव त्या मूर्तीचे असे सिंधुताई...|| कोवळेसे वय होते खेळायाचे, आई-बापाला तीच्या भय होते याचे.. त्याच वयामधे तिचे लावले लगीन, चिमुकली पोर झाली चीन-बिन..; नवरा तो तिचा जणू होताच कसाई ...||१|| पंधराव्या वर्षी तिला लागले डोहाळे, नवर्याने मात्र नाही सोडले चहाळे, मारून-झोडपून तिला बाहेर काढले, जगी दाखवण्यासाठी तिला गोठ्यात टाकले ; तिच्या मदतीला आली गोठ्यातली गाई ...||२|| गोठ्यामधे तिला झाली सुंदरशी पोर , नशिबाच्या पुढे ना चाले कोणाचाही जोर ; काय करणार अशी नार एकटी ? ताकतही नाही अजुन तिच्या मनगटी ; तिच्या मदतीला तेव्हा कुणी आलं नाही ...||३|| स्मशानात राहून तिने दगडी वेचल्या, जळत्या सरणावर तिने भाक~या भाजल्या ; पोरिसाठी कधी ती राहिली उपाशी, तरी नाही घातले कधी गा~हाने नभाशी, भूकेल्यासाठी ती झाली जणू मोठी ताई ...||४|| स्वताची पोर तिने परक्यास दिली , (दगडूशेठ हलवाई) अनाथ मुलांची मग जबाबदारी घेतली ; वाढवला तिने असा परिवार मोठा , मोठेपनाचा नाही आणला आव खोटा ; हजार मुलांची आज आहे हीच आई ...||५|| घडवली तिने आज कि

===विधवा===

कोणी जाणून घेइल का,तिच्या मनातील शल्य, सोडून गेला नवरा, ठेवून असे निर्माल्य...| जगने आता तिचे हे, असे फ़क्त पोरांचे, एकटी आता ही विधवा, भय असे तिला चोरांचे...|| दिवस रोज उगवतो, घेउन नवी आशा, तिच्या पदरी मात्र, असे फ़क्त निराशा...| जसा सूर्य मावळतो, तशी तीही खरी मावळते, दाटती अंधार मनातून, आतून तीही मग जळते...|| पोरांच्या पदरी नाही, बापाची भोळी माया, विधवेच्या नशिबी आली, कसली ही उष्टी काया...| पैशांची परवड झाली, सामाजिक प्रतिभा गेली, तीच्या मनातून आता, जगण्याची इच्छा मेली...|| दिला कुणी आधार तर, उपकार तिच्या मनाला, आयुष्य जगता येईल, तिला त्या एका क्षणाला...|| ===विक्रम वाडकर===(०५-०४-१०)

तो पाऊस.........

आठवतो का तुला तो पाऊस, ज्यात आपण चिंब भिजलो होतो.... तुझी मस्ती पाहुन.... खरं सांगतो..मीच लाजलो होतो......॥ आठवतो का तो पाऊस जेव्हा, मी तुला छत्री दिली होती.... आणि तुझीच छत्री दाखवुन, तु माझी फ़जिती केली होती....॥ आठवतो का तुला तो पाऊस, मी जेव्हा गाडीवरुन पडलो होतो.... गाडीच फ़क्त निमीत्त मी तर तुझ्या सौंद-याच्या प्रेमात पडलो होतो....॥ आठवतो का तुला तो पाऊस, जेव्हा मी तुझ्यासाठी भजी आणली होती.... "भजी नाही मला समोसे आवडतात", तु थाटात म्हणली होतीस....॥ आठवतो का तुला तो पाऊस, जेव्हा ’आइ लव्ह यु’ म्हणालो तुला.... "वेड्या इतका वेळ लावलास", एवढच बोललीस तु मला...॥ आठवलाच असेल तो पाऊस, कारण आजही पाऊस पडतोय.... आपल्यातील हे प्रेम बघुन, आजही तो आनंदाने रडतोय....॥ -------विक्रम वाडकर (३१-०७-१०)

तुझी नजर..............

माझ्या मनाचं दार अलगद तु खोलुन जाते, तु नाही बोलत... पण तुझी नजर बोलुन जाते.., तुझ्या मनातील भावनांचा विचार मनी ठेउन जाते, तु नाही बोलत... पण तुझी नजर बोलुन जाते...॥ रिते सारे मन माझे, जग रिते त्या क्षणी‍, रिते रिते दिन जाती, अशा तुझ्या आठवणी..., रित्या माझ्या आयुष्याला नवी दिशा देउन जाते...॥१॥ तहानलेल्या या जिवाला तारणारी तु परी, कधी होती भास मजला कधी वाटे तु खरी....., रोज तुझ्या आठवणींचा लळा तु लावुन जाते...॥२॥ भरजरी वस्त्रात चिंब भिजणारी नार तु, या नभीच्या अंतरातुन बरसणारी धार तु....., तुझ्या स्मित हास्याने मला वेड लावुन जाते...॥३॥ ------विक्रम वाडकर(३०-०७-१०)

माझी पहिली कविता..

माझ्या जिवनातील माझी पहिली कविता ............. जीवन- एक कोडं ?? काराल्यापेक्षा कडू असतं ,साखरेपेक्षा गोडं असतं ; जीवन हे जीवन असतं, न सुटलेल कोडं असतं.... कधी असतात घरातच मोठ-मोठ्या गाड्या, कधी जागाही मिळत नाही घरात बांधायला माडया, या सर्व प्रपंचाला पैसा हेच तोडं असतं || जेव्हा जीवनात येतात आपल्या , दुखातली दुःख , त्यांचाही पाठलाग करतात क्षणभराची सुखं , कितीही दुःख आलं तरी ,सुखं मात्र थोडच असतं || कधी असतात आयुष्यात ,महाभारत-गीता , तर कधी येतात सीता , नीता , रिता , पण आयुष्याच्या हातगाडीला जीवनसाथीच जोड़ असतं || बालपनात आईची ,कुमारवयात नात्यांची , तरुणपनात मित्रांची ,म्हातारपनात नातवन्दांची , जीवनाच्या वाटेवर येणारं असही एक मोडं असतं || कधी फ़लातील रस बनावे ,कधी फुलातील सुगंध व्हावे , कधी पालवी होउन हिरवी , फांदीवरती मस्त झुलावे , इतकं मोठं झाड़ असलं तरी ,म्रुत्युचच त्याला खोड़ असतं |||||||| -------------विक्रम वाडकर--------------