===मी मुंबईकर===

लोकलची खडखड, काळजाची धडधड,
तोंडाच्या घासला पैशाची परवड.......

गुंडाचा राडा, पोलिसांच्या धाड़ा,
सामान्य माणसाला, बाराचा पाढा......

मराठ्याची गाय, भैयांचा व्यवसाय,
त्यांच्या दुधाला मात्र, पैशाची साय......

सणाचे दिवस, अनवाणी नवस,
दिसेनाशी झाली आता, अंगानातली तुळस......

नेत्यांची निती, दंगालींची भीती,
खुर्चीच्या नादाने, सडली राजनिती.......

मुलांचे लाड, फैशनच फैड,
आई-बाबा गेले, उरले मॉम-डैड.......

पावसाच्या धारा, किंवा ग्रिष्माचा वारा,
हाय-अलर्ट नेहमी,येती अंगावर शहारा.......

परकियांना दाणा, अन स्वकियांना वहाणा,
इंग्रजी अन हिंदीपाई, विकला मराठी बाणा?......

देशासाठी मेले, महाराष्ट्राचे चेले,
आमच्या पदरी आले फ़क्त, आतंकाचे हल्ले.......

आम्हा नाही डर, जोवर शाबूत आहे घर;
जगण्याचीही उमेद देई, हा मुंबईकर......||

===विक्रम वाडकर===

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १