तो पाऊस.........
- Get link
- X
- Other Apps
आठवतो का तुला तो पाऊस, ज्यात आपण चिंब भिजलो होतो....
तुझी मस्ती पाहुन.... खरं सांगतो..मीच लाजलो होतो......॥आठवतो का तो पाऊस जेव्हा, मी तुला छत्री दिली होती....
आणि तुझीच छत्री दाखवुन, तु माझी फ़जिती केली होती....॥
आठवतो का तुला तो पाऊस, मी जेव्हा गाडीवरुन पडलो होतो....
गाडीच फ़क्त निमीत्त मी तर तुझ्या सौंद-याच्या प्रेमात पडलो होतो....॥
आठवतो का तुला तो पाऊस, जेव्हा मी तुझ्यासाठी भजी आणली होती....
"भजी नाही मला समोसे आवडतात", तु थाटात म्हणली होतीस....॥
आठवतो का तुला तो पाऊस, जेव्हा ’आइ लव्ह यु’ म्हणालो तुला....
"वेड्या इतका वेळ लावलास", एवढच बोललीस तु मला...॥
आठवलाच असेल तो पाऊस, कारण आजही पाऊस पडतोय....
आपल्यातील हे प्रेम बघुन, आजही तो आनंदाने रडतोय....॥
-------विक्रम वाडकर (३१-०७-१०)
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment