तुझी नजर..............

माझ्या मनाचं दार अलगद तु खोलुन जाते, तु नाही बोलत... पण तुझी नजर बोलुन जाते..,
तुझ्या मनातील भावनांचा विचार मनी ठेउन जाते, तु नाही बोलत... पण तुझी नजर बोलुन जाते...॥

रिते सारे मन माझे, जग रिते त्या क्षणी‍, रिते रिते दिन जाती, अशा तुझ्या आठवणी...,
रित्या माझ्या आयुष्याला नवी दिशा देउन जाते...॥१॥

तहानलेल्या या जिवाला तारणारी तु परी, कधी होती भास मजला कधी वाटे तु खरी.....,
रोज तुझ्या आठवणींचा लळा तु लावुन जाते...॥२॥

भरजरी वस्त्रात चिंब भिजणारी नार तु, या नभीच्या अंतरातुन बरसणारी धार तु.....,
तुझ्या स्मित हास्याने मला वेड लावुन जाते...॥३॥

------विक्रम वाडकर(३०-०७-१०)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १