===लोकधारा-२===

मथुरेच्या गवळणी,या मथुरेच्या गवळणी....

घेउनी माठ, चालुनी ताठ, उतरुनी घाट....
आल्या साजनी...मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी.....||

आला मग कान्हा, घेउनी गणा, मोहिसी भाना.....
शुभ्र या दिनी.....मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी...||

पाहती सखी, दर्शनी मुखी, नयन केतकी,
तो चक्रपाणी...मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी.....||

फेकिला खडा, फोड़ीले घडा, पाडती सडा,
पाहुनी लोणी....मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी......||

सख्या तरी शांत, नसे जणू भ्रांत, वाटे एकांत,
तयांच्या मनी...मथुरेच्या गवळणी, या मथुरेच्या गवळणी....||

झाल्या या ऋणी, अशा मथुरेच्या गवळणी........|||

===विक्रम वाडकर===

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १