Posts

Showing posts from September, 2015

गणेश स्वरूप

सुंदर सोज्वळ.. गणेश स्वरूप... असे तुची भुप.. जगदिश.. मनोहरी नेत्र.. कृपेचे सागर.. जोडतो मी कर.. तुजलागे.. कर्ण भले मोठे.. उदर विशाल.. चंद्रकोरी भाळ.. शोभतसे.. चरणात तुझ्या.. मिळतो रे स्वर्ग.. वाहतो मी अर्घ्य.. तुजसाठी.. विसरतो आम्ही.. मनातील चळ.. वाजवितो टाळ.. भक्तीमध्ये.. गजानन तुची.. तुची विघ्नहर्ता.. सारे तुझ्या करिता.. तुच्छ आहे.. सदा तुझा असो.. शुभ-आशिर्वाद.. तु निर्विवाद.. सुखकारी.. पाहण्यात तुला.. होतो मी ही दंग.. लिहीतो अभंग.. विक्रम हा.. - विक्रम वाडकर 21/09/2015 12:04 pm

स्वातंत्रवीर

स्वातंत्र्याच्या खेळामधला कर्णधार तो.. रक्तानेही रंग भरणारा चित्रकार तो.. रणसंग्रामासाठी सज्ज नेहमी.. तो असे..वज़ीर.. त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर.. स्वातंत्रवीर .. धडाडीत तो बोले तत्पर.. क्षणात भेदी सुक्ष्म मनांतर.. सुर्यालाही तेज अनावर.. राहणी असा जसा आहे फकिर... त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर..स्वातंत्रवीर.. भारतभू चा विचार होता सदा मनी... चातुर्याचा प्रत्यय देती क्षणोक्षणी... असेल हिम्मत अशी कुणाच्या तरूणपणी.. झुकले नाही कोणासमोरही ज्याचे शिर.. त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर..स्वातंत्रवीर.. स्वातंत्राची बांधुण देण्या पायघडी.. एकाकी होऊन जो लढला असा गडी.. ज्याच्यासाठी सागरातली महाउडी.. आत्मविश्वासावर सोडूनी, सा-या फिकीर.. त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर..स्वातंत्रवीर.. --विक्रम वाडकर. 14/09/2015 04:38 pm

म्हणे त्याचं आणि माझं नातं काय..

म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.... जेव्हा तो दुःखी असतो.. मनाला आधार हवा असतो.. मित्र म्हणून मला पाहतो... आधार बनले त्याचा मी तर त्यात इतके वाईट काय? म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.... स्वतः मला हसवत राहतो.. माझे न ओघळलेले अश्रू पाहतो.. त्याच्या एका हास्यासोबत, हसले मी तर चुकलं काय?? म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.... मीही चिडते कधी कुणावर.. राग होतो कधी अनावर.. असे असुनही माझ्यासोबत बसला तो तर बिघडलं काय? म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.... प्रेम आहे हे सत्य आहे... मैत्रीमधे नित्य आहे.. मित्र म्हणावे तर समजून घ्यावे.. आम्हाला समजले.. मग तुमच काय? म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.... अरे नाते विचारता तुम्हीच सज्जन.. पहा स्वतःतच डोकावून काही क्षण.. इतरांच्या नात्याला पाहता..त्यावाचून तुमच अडलं काय? म्हणे त्याचं आणि माझं नातं काय.... --विक्रम वाडकर 05/09/2015 01:35 am