Posts

Showing posts from August, 2015

सवे तुझ्या

रात्र ही मोहरली जशी.. मिठीमधे विरघळले मी तुझ्या.. तुझ्यासवे बेभानले अशी.. ओठांनी नशाळले मी तुझ्या.. मी तुला.. तु मला.. ओळखुया.. स्पर्शाने नव्या.. हर्षाने नव्या.. हरवल्या दिशा.... सवे तुझ्या....सवे तुझ्या.... श्वासांनी एकरूप व्हावे.. हरखून जावे.. मी पुन्हा.. अंग-अंग शहारून जावे.. हरवून जावे.. मी पुन्हा.. कुरवाळून या बटा.. ओढ लावून.. जाऊ नकोस तु मला.. मी तुला.. तु मला.. ओळखुया.. स्पर्शाने नव्या.. हर्षाने नव्या.. हरवल्या दिशा.... सवे तुझ्या....सवे तुझ्या.... तुझी कुशी.. माझी उशी.. तारे नभीचे.. असे सारे सोबती.. सोबतीला लागे ना कुणाची नजर.. हलके हलके मनामधे प्रेमाची लहर.. अशा बेधुंद रात्री.. बिलगावा तु मला.. मी तुला.. तु मला.. ओळखुया.. स्पर्शाने नव्या.. हर्षाने नव्या.. हरवल्या दिशा.... सवे तुझ्या....सवे तुझ्या.... -विक्रम वाडकर26/08/2015 12:01 am

जीवघेणा..

रंगल्या मैफिलींच्या सभा, सभेत तुझ्या अदा.. कशा जीवघेण्या.. कळीचेही फुल होई जेव्हा उघडती..तुझ्या पापण्या.. पापण्यांच्या आड लपली तुझी तिखी तिखी नजर.. नजरेच्या चांदणीचा झाला, हृदयावर थेट असर.. जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४ दिल तो है ताला, तु ही है चाबी.. तेरी हर अदा, लगती है नवाबी.. तुझ्या केसांच्या बटा.. ओठी नशील्या छटा.. स्पर्शता शहारला काटा.. जीवघेणा.. जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४ गोरा गोरा तेरा बदन है जैसे कयामत की कहर.. बोल तु एकदा.. बस पी लू मै लाखो जह़र.. अक्स़ भी तेरा.. जादू करतो का सांग ना.. यादो मे तेरे.. मी भरकटतो का सांग ना.. सांग ना..सांग ना..सांग ना..सांग ना.. जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४ तुझीच साथ मी मागतो.. सातो जनम.. राहशील का माझी बनुन.. सांग माझी सनम.. सांग ना..सांग ना..सांग ना..सांग ना.. जीवघेणा.. तुझा हा नखरा.. x४ --विक्रम वाडकर 05/08/2015 11:55 am