Posts

Showing posts from May, 2015

तु गेल्यावर...

तु गेल्यावर अंगणातली तुळसही रूसली माझ्यावरती... नभ गहीवरता भिजते व्याकूळ तहानवेडी जशी ही धरती.. तु गेल्यावर... तु गेल्यावर... तु गेल्यावर मोग-यातले.. फुल सुखाचे उमलत नाही.. पाकळ्यासवे उलगडणारे भाव मनाचे बिलगत नाही.. जिवनातल्या चित्रांमधले रंग ही हसले माझ्यावरती.. तु गेल्यावर... तु गेल्यावर... तु गेल्यावर झोपाळ्यांचे.. सुने जाहले हे हिंदोळे.. पदराचीही वाट पहाती.. आरशातले ओले डोळे.. नभी यातना पावसातूनी.. अश्रू बरसले माझ्यावरती.. तु गेल्यावर... तु गेल्यावर... -विक्रम वाडकर 23/05/2015 08:22 pm

शिवबा

परिसासम माझा राजा.. शिवबा ज्याचे नाव.. रायगड त्याचा ठाव.. अजुनही..|| हि-या-मोत्यापरी अनमोल ज्याचेे मावळे.. घरोघरी त्याची राऊळे.. अजुनही..|| नजरेतल्या तेजासम लखलखता त्याचा चेहरा .. स्वराज्यावर असे पेहरा.. अजुनही..|| प्रण असे मनी.. अन्यायमुक्त धरती.. दुनियेभर किर्ती.. अजुनही..|| ठेवा जाण अशा जाणत्या राजाची.. भगव्या ध्वजाची.. अजुनही..|| दाखवा सह्याद्रीच्या वाघाचे बछ़डे.. आहोत रांगडे.. अजुनही..|| --विक्रम वाडकर 22/05/2015 09:54 am क्षत्रियकुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती नरपती हरपती भूपती शिवाजी महाराज की जय..

रूबरू हुए जिस्म से.. रूहाना बन गए हो..

नज़रो से दिल की बाते.. यु बयाँ कर रहे हो.. रूबरू हुए जिस्म से.. रूहाना बन गए हो.. तन्हा रहके तन्हाईयोसे.. गुफ्तगू थोडासा कर लू.. दिलो की रंजिशो का.. बहाना बन गए हो... सितम ढाती हो लाखो.. मदभरे नैनो से तुम.. मदिरा की बुंद से अब.. मैखाना बन गए हो.. बंजर हुई थी धरती.. ख्वाबो के अंजुमन मे.. जिंदगी से जुड गए हो.. सुहाना बन गए हो.. रुक्सार हुआ मंजिलो से.. जबसे मिले हो मुझको.. शमा की लौ से बढकर.. परवाना बन गए हो.. - विक्रम वाडकर 22/05/2015 05:42 pm

तुझ्या मिठीची ही साखळी.. हवीहवी..

तुझ्या आठवांची वेळ..ऊन पावसाचा खेळ.. गहिवरल्या आनंदाची फुलते पाकळी.. तुझ्या मिठीची ही साखळी.. हवीहवी.. एकतारीच्या सुरात.. गुणगुणते आज मी.. सुखाच्या पावलांत.. रुणझुणते आज मी तुझ्या सुगंधात दरवळणारी.. रातराणी मी नवी.. काजव्याच्या प्रकाशाने.. लखलखते जणू रात.. तुझ्याच हलक्या स्पर्शाने.. टाकते मी जुनी कात.. अलगुज कानी सांगणारी.. ऐकू येई भैरवी.. नजरेच्या या खुणांनी.. उरी भावनांची भरती.. संसाराच्या गोड स्वप्नांनी.. दिन रात माझे सरती.. दर्पणात लाजते मी.. पाहूनी तुझी छवी.. -विक्रम वाडकर 19/05/2015 10:03 am

डोळ्यामधले आभाळ

मुक्या मुक्या ओठांवरी नाव तुझे अडखळले.. डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले.. कळल्या न तुला भावना या मनाच्या.. आसवांत भाव ते विरघळले.. डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले.. (मनातलं ओठांवर आलं, पण शब्द मुके झाले... सापडलीच होती वाटं, पण रस्तेच धुके झाले...) भरली ओंजळ हास्याची अन्.. वासे सुखाचे निखळले.. डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले.. खिळली नजर.. ज्यात भरले जहर.. घाव दुखाचे भळभळले.. डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले.. -विक्रम वाडकर 17/05/2015 11:23 am

ईश्वराची आत्मा

तुझ्या चरणी जग सारे घाली लोटांगण.. तुझ्यामुळे दिवस रोज आता वाटतो ग सण... यश माझे होता त्यात तुझा शुभ-आशिर्वाद.. कष्टी होता कधी,.. पहिली तुलाच असे साद.. रोजच्या घासाला आई.. ओठी तुझे नाव.. ठसका लागता आई.. पहीली तुझी धाव.. कधी अडखळता मन तुझे शब्द देती धीर.. जिवनाच्या संगीताचा तु ग पहीलाच सुर.. शब्दामधे कसे मांडू ऋण अशा माऊलीचे.. साथ तुझी सदा असो जसे देहा सावलीचे.. आई तुझ्याच नावात.. मज मिळतो आधार.. 'ई'श्वराच्या 'आ'त्म्याचा.. आई तुच असे सार.. -विक्रम वाडकर 10/05/2015 03:54 pm

आनंदकल्लोळ

पांथस्ताचा पाथ व्हावे.. सरल सरळ समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ.. अपयशा पाचण्याचे.. द्यावे मज बळ.. समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ .. भुकेल्याचा घास व्हावा.. दुखेल्याचा खांदा.. रडवेल्या चेह-यांसाठी.. हसवण्याचा धंदा.. कष्टी झाल्या मनांचीही काढू नये कळ.. समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ.. आंधळ्याच्या हातची.. कधी व्हावी काठी.. माणसाचा जन्म आहे.. माणसांच्या साठी.. वित्ताचा हव्यास नको.. व्हावे चित्ताने निर्मळ.. समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ.. भांडणांचे सुर नको.. होती जवळचे दुर.. समजुनी घ्यावे सा-यां.. हटवुनी धुर.. पारदर्शी होऊ द्यावा.. मनाचा हो तळ.. समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ.. -विक्रम वाडकर 08/05/2015 12:05 am

दिल दिवाणे..

दिल दिवाणे जाहले.. तार छ़ेडु लागले.. सांगणे या मनाचे.. नैन बोलू लागले... हे.. मतलबी हवा है यारो.. प्यार की लिए खुशबू.. मतलबी घट़ा है यारो.. बरसने लगी जादू... मन हे वेडावले.. पाहुनी चेहरा गोजिरा.. इश्क की ये जुबाँ..बोल तु जरा... रंग ढंग कसे वेगळे.. भाव वेडेे मनमोकळे.. वागणे मज हे ना कळे.. खुणावती आता किती खुळे हे इशारे..x२ दि रा रा.. बहकी बहकी अब रात है.. कहने की भी क्या बात है.. आँखो की है जो बोली.. पढ ले जो ये जज्बात है.. आस जो दिल की.. सुहाने ये पल की.. साठवून मनी राहू दे... दि.. द..रारारा.. दि.. दरा.. दि.. द..रारारा.. दि.. दरा..... --विक्रम वाडकर 03/05/2015 11:44 pm

कवी..

(सर्व कवी-कवीयत्रींना अर्पण) अखंडशुन्य भेदिती.. विशाल काल शोधिती.. विचार सार काढिती.. कवी जयास बोलती.. मनामनास जाणता.. सहस्त्र गात्र मानता.. मुक्यास वाचा फोडतो.. दुवे हवेत जोडतो.. मनस्वीतेचा सुर्य हा.. सदोदित ऐश्वर्य हा.. साहीत्यीक व्यासंगी जो.. जिभेवरी कुरवाळीतो.. असो भक्तीचे निर्माल्य.. वा बोचणारे शल्य.. पानांवरी सांडतो.. अन् शब्दबद्ध मांडतो.. शब्द जे करती अमर.. स्वर्ग काव्याचे शहर.. क्षणाक्षणात राहतो.. कणाकणात वाहतो.. सायासाने करीतो साध्य.. जन मनाचा सुवर्णमध्य.. लेखणीतुनी साकारतो.. 'कवी' 'कवी' 'कवी'च तो.. -विक्रम वाडकर..02/05/2015 11:41 pm

जय जय महाराष्ट्र..

दुथडी भरूनी वाहणा-या नद्यांचे हे राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. ज्ञाना-तुकाच्या अभंगवाणीत रमलेले राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. शिवरायाच्या स्वराज्याचे स्मारक हे राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. स्वातंत्राच्या लढवय्यांनी भरलेले राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. चित्रपटांच्या जनकाचे, फाळकेंचे राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. साहित्यांच्या महाग्रंथानी तुडुंब हे राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. भारतभुच्या उदरामधले कणखर हे राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. सौभाग्याने जन्म मिळावा असे पावन राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. मराठमोळा बाज रांगडा मराठमोळे राष्ट्र.. बोला जय जय महाराष्ट्र.. -विक्रम वाडकर 01/05/2015 05:40 pm