शिवबा

परिसासम माझा राजा.. शिवबा ज्याचे नाव..
रायगड त्याचा ठाव.. अजुनही..||
हि-या-मोत्यापरी अनमोल ज्याचेे मावळे..
घरोघरी त्याची राऊळे.. अजुनही..||
नजरेतल्या तेजासम लखलखता त्याचा चेहरा ..
स्वराज्यावर असे पेहरा.. अजुनही..||
प्रण असे मनी.. अन्यायमुक्त धरती..
दुनियेभर किर्ती.. अजुनही..||
ठेवा जाण अशा जाणत्या राजाची..
भगव्या ध्वजाची.. अजुनही..||
दाखवा सह्याद्रीच्या वाघाचे बछ़डे..
आहोत रांगडे.. अजुनही..||
--विक्रम वाडकर 22/05/2015 09:54 am

क्षत्रियकुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती नरपती हरपती भूपती शिवाजी महाराज की जय..

Comments

  1. फारच अप्रतिम..! तंतोतंत सत्य..🔱✅🇮🇳🚩💐🌙🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १