कवी..

(सर्व कवी-कवीयत्रींना अर्पण)

अखंडशुन्य भेदिती.. विशाल काल शोधिती..
विचार सार काढिती.. कवी जयास बोलती..

मनामनास जाणता.. सहस्त्र गात्र मानता..
मुक्यास वाचा फोडतो.. दुवे हवेत जोडतो..

मनस्वीतेचा सुर्य हा.. सदोदित ऐश्वर्य हा..
साहीत्यीक व्यासंगी जो.. जिभेवरी कुरवाळीतो..

असो भक्तीचे निर्माल्य.. वा बोचणारे शल्य..
पानांवरी सांडतो.. अन् शब्दबद्ध मांडतो..

शब्द जे करती अमर.. स्वर्ग काव्याचे शहर..
क्षणाक्षणात राहतो.. कणाकणात वाहतो..

सायासाने करीतो साध्य.. जन मनाचा सुवर्णमध्य..
लेखणीतुनी साकारतो.. 'कवी' 'कवी' 'कवी'च तो..
-विक्रम वाडकर..02/05/2015 11:41 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १