तु गेल्यावर...

तु गेल्यावर अंगणातली तुळसही रूसली माझ्यावरती...
नभ गहीवरता भिजते व्याकूळ तहानवेडी जशी ही धरती..
तु गेल्यावर... तु गेल्यावर...

तु गेल्यावर मोग-यातले.. फुल सुखाचे उमलत नाही..
पाकळ्यासवे उलगडणारे भाव मनाचे बिलगत नाही..
जिवनातल्या चित्रांमधले रंग ही हसले माझ्यावरती..
तु गेल्यावर... तु गेल्यावर...

तु गेल्यावर झोपाळ्यांचे.. सुने जाहले हे हिंदोळे..
पदराचीही वाट पहाती.. आरशातले ओले डोळे..
नभी यातना पावसातूनी.. अश्रू बरसले माझ्यावरती..
तु गेल्यावर... तु गेल्यावर...

-विक्रम वाडकर 23/05/2015 08:22 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १