Posts

Showing posts from January, 2017

ए परी..

ओठांशी ओठांनी केली सलगी, ह्रृदयात वाजी पैंजणे तुझी हलकी, नेई जीव चोरुनी आकाशी.. ए परी... स्वप्न कि तु खरी... ए परी... चाहुल येते, हा भास देते, जणू तु बिलगते, स्वप्नांतुनी, हळुवार यावे, वा-यास द्यावे, गंधीत जावे क्षण हे, भांबावुनी, कसा सावरू स्वतःला स्वप्नसुंदरी... स्वप्न कि तु खरी... ए परी... श्वासांतरांनी, जुळली मनांनी, दोन जीवांनी जडली प्रीती जिथे, सुखदायी व्हावा, संसार आपला, नात्यांत जपला सुर नांदे तिथे, आनंद आपला भिडूदे या अंबरी... स्वप्न कि तु खरी... ए परी... -- विक्रम वाडकर