ए परी..

ओठांशी ओठांनी केली सलगी,
ह्रृदयात वाजी पैंजणे तुझी हलकी,
नेई जीव चोरुनी आकाशी.. ए परी... स्वप्न कि तु खरी... ए परी...

चाहुल येते, हा भास देते, जणू तु बिलगते, स्वप्नांतुनी,
हळुवार यावे, वा-यास द्यावे, गंधीत जावे क्षण हे,
भांबावुनी,
कसा सावरू स्वतःला स्वप्नसुंदरी... स्वप्न कि तु खरी... ए परी...

श्वासांतरांनी, जुळली मनांनी, दोन जीवांनी जडली प्रीती जिथे,
सुखदायी व्हावा, संसार आपला, नात्यांत जपला सुर
नांदे तिथे,
आनंद आपला भिडूदे या अंबरी... स्वप्न कि तु खरी... ए परी...

-- विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १