Posts

Showing posts from June, 2015

व्यास

सुखादुखाच्या व्यासाभोवती.. आयुष्याचा परिघ घडतो.. प्रवास होवो कितीही खडतर, सुरुवातीवर शेवट जडतो.. झरा बघावा सुंदर निर्मळ, उंचावरूनी तोही पडतो.. जमिनीवरल्या अडथळ्यांना, एकाएकी जाऊन नडतो.. कधी सावरतो स्वप्नांमधुनी, सत्यामध्ये कधी बिघडतो.. आयुष्यातील खोल कवाडे, वेळेआधी कसा उघडतो.. क्षणाक्षणाला हा धडपडतो, परि कधीही ना तो रडतो.. विश्वासाच्या काडीवरती, माणसाचाही आधार दडतो.. -विक्रम वाडकर 30/06/2015 08:39 pm

सज़ा

सोचता हूं, दिल के कोने कोने मे तुझे समाँ लूं,. फिर सोंचू, तुझे क्यू दिल मे कैद रहने की सजा दूं.. तुझे तो जमीन पर रहने की भी जरूरत नही., तेरे ख्वाबो की उडान को खास कोई महुरत नही.. कामयाबी कदमो मे होने के लिए ही तुझे दुवा दू.. तुझे क्यू दिल मे कैद रहने की सजा दूं.. तु इबादद करे किसी चींज़ की, वो मिलाने की ताकत तुम्हे मिले.. गर ना भी मिले हुकुमत, बस सबऱ करने की हिम्मत तुम्हे मिले.. तेरी खुशियो मे मेरे खुशियों को सज़ा लू.. तुझे क्यू दिल मे कैद रहने की सजा दूं... -- विक्रम वाडकर

प्रेमळ पाहुणा

नभाने जशी ऐकावी साद.. धरतीच्या मनीची.. आडोशाला उभी ओली छत्री.. आपल्या सहवासाच्या आठवणींची.. चहाच्या वाफेसोबत असलेली ती.. गरमागरम भजी.. खिडकीतून आलेली थंड झुळुक.. सोबत तु आणि मी.. विजांच्या कडकडाटाने घाबरून.. कडाडून मारलेली मिठी.. लाजेने लाल झालेली अन्.. झुकलेली तुझी हनुवटी.. मातीच्या सुगंधाने हरखून गेलेल्या.. सुगंधी भावना.. तुझ्या माझ्यामधला दुवा सांधणारा हा जुना पाहुणा.. प्रेमाच्या ओलाव्याने चिंब भिजलेला.. कोरा कागद.. प्रेमाच्या हळव्या ॠतुने केलेले हे.. प्रेमळ स्वागत.. --विक्रम वाडकर 12/06/2015 09:26 am

शुभ मंगल

सौख्य लाभावे तुम्हा, ईश हाची मागतो.. साथ राहू दे सुखे, दैव जेथे नांदतो.. संसाराचे रहाटगाडे, दोन चाकांनी सांभळा.. एकमेका जोडूनी, भार सारा सावरा... दुखाच्या किनारीला सुखाची झालर मिळो.. सुईस धाग्याची गरज, तुम्हा ती लवकर कळो.. भांडणाचा सुर ही यावे, गालबोटासारखे.. दिस तो सरता एकट्याने, या पुन्हा जुन्यासारखे.. थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने, थाट तुम्ही करा सुरू.. दुखा बाजुला सारून.. ओंजळाने सुख भरू... -विक्रम वाडकर 08/06/2015 11:24 am

ईश्क तो ईश्क होता है..

ईश्क तो ईश्क होता है.. थोडासा रिस्क होता है.. कभी २ घडी तो कभी ७ जन्मो के लिए फिक्स होता है... सच है, ईश्क तो ईश्क होता है.. कोई प्यार कहता है.. कोई मोहोब्बत कहता है.. जुबाँ से कोई बोले न बोले.. इन्सान के दिल मे तो यही रहता है.. सच है, ईश्क तो ईश्क होता है.. खुषी मे आंसू बनता है.. गम मे भी आंसू बनता है.. दिल की तो हम सुनते है पर.. दिल कहा किसी की सुनता है.. सच है, ईश्क तो ईश्क होता है.. कभी आँखो से बयान होता है.. कभी होंठो से बयान होता है.. ना समझ़े तो नादान... और समझ़ आए तो इन्सान होता है.. सच है, ईश्क तो ईश्क होता है..