प्रेमळ पाहुणा

नभाने जशी ऐकावी साद..
धरतीच्या मनीची..
आडोशाला उभी ओली छत्री..
आपल्या सहवासाच्या आठवणींची..
चहाच्या वाफेसोबत असलेली ती..
गरमागरम भजी..
खिडकीतून आलेली थंड झुळुक..
सोबत तु आणि मी..
विजांच्या कडकडाटाने घाबरून..
कडाडून मारलेली मिठी..
लाजेने लाल झालेली अन्..
झुकलेली तुझी हनुवटी..
मातीच्या सुगंधाने हरखून गेलेल्या..
सुगंधी भावना..
तुझ्या माझ्यामधला दुवा सांधणारा
हा जुना पाहुणा..
प्रेमाच्या ओलाव्याने चिंब भिजलेला..
कोरा कागद..
प्रेमाच्या हळव्या ॠतुने केलेले हे..
प्रेमळ स्वागत..
--विक्रम वाडकर 12/06/2015 09:26 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १