शुभ मंगल

सौख्य लाभावे तुम्हा, ईश हाची मागतो..
साथ राहू दे सुखे, दैव जेथे नांदतो..

संसाराचे रहाटगाडे, दोन चाकांनी सांभळा..
एकमेका जोडूनी, भार सारा सावरा...

दुखाच्या किनारीला सुखाची झालर मिळो..
सुईस धाग्याची गरज, तुम्हा ती लवकर कळो..

भांडणाचा सुर ही यावे, गालबोटासारखे..
दिस तो सरता एकट्याने, या पुन्हा जुन्यासारखे..

थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने, थाट तुम्ही करा सुरू..
दुखा बाजुला सारून.. ओंजळाने सुख भरू...

-विक्रम वाडकर 08/06/2015 11:24 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १