Posts

Showing posts from July, 2018

हरी पांडूरंग हरी..

मुखात अभंग, हातात मृदुंग, हरिनामी होतो आम्ही तल्लीन.. गळयामध्ये टाळ, तुळशीहार माळ, तुझ्या नामानेही उडतो हा क्षीण.. मायबाप जगताचा या, उभा विटेवरी... चंद्रभागा गंगा अमुची, स्वर्ग ही पंढरी... नाम घोषाने दुमदुमली वैकुंठ नगरी.. हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... हरिजन सारे मागती हे दान.. माऊलींच्या चरणी लागो तन - मन - ध्यान.. वारकरी असता कोणी, थोर नाही सान... विष्णुमय झाली, आज माऊलींची वारी.. नाम घोषाने दुमदुमली वैकुंठ नगरी.. हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... हाती असे वीणा, कुठे डोईवर तुळस... भेटीलागे पंढरपुरा, येईना आळस... सुखावून जाती सारे, पाहुनी कळस... भान देहाचे सोडूनी, नाचे वारकरी.. नाम घोषाने दुमदुमली वैकुंठ नगरी.. हरी पांडुरंग हरी,हरी पांडुरंग हरी.... सार्थ विठ्ठल ..आर्त विठ्ठल.. सत्य विठ्ठल.. अर्थ विठ्ठल.. रंग विठ्ठल.. संग विठ्ठल.. आत्म विठ्ठल.. सत्व विठ्ठल.. राम विठ्ठल.. श्याम विठ्ठल.. देह विठ्ठल.. धाम विठ्ठल.. काम विठ्ठल.. नाम विठ्ठल.. हरी विठ्ठल.. हरी विठ्ठल.. हरी विठ्ठल.. हरी विठ्ठल.. - विक्रम वाडकर  2