Posts

Showing posts from 2016

चुका

माणसे सोबत असताना त्यांच्या चुकांचा हिशोब मांडण्यात आपण इतके गुरफटून का जातो? केलेल्या चुकीबद्दल माफी मागूनसुद्धा त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्याच चुकीची जाणीव का करून देतो? चुक छोटी असो वा मोठी समोरच्याने मागितलेली माफी मनापासून असेल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करून त्या चुकांवर विरजण आपण का नाही घालत? खरचं, माणसांच्या चुकांनी त्यांच्या मनाला सतत खात रहावं का? खंत वाटते. 'काही चुका विसरता येत नाहीत' असे म्हणणारे सुद्धा ती व्यक्ती गेल्यावर त्याच्या चुकांना विसरून जाते. का? कारण आता त्या चुकांना कोणी मायबाप नसतो. त्या तोपर्यंत जिवंत असतात जोपर्यंत आपण त्यांना आपल्या मनात जिवंत ठेवतो.          समोरच्या व्यक्तीचे मन स्वच्छ असुनही त्या व्यक्तीकडून चुक घडली तर त्याला गुन्हा मानने कितपत योग्य आहे? न्याय देण्यासाठी सर्वात मोठ न्यायालय प्रत्येकाच्या मनात असतं. जिथे आरोपीही आपण, वकिलही आपण. साक्षीदारही आपण आणि न्यायाधीशदेखिल आपणच. तिथे भोगलेल्या शिक्षेलादेखिल कोणी साक्षी नसतो.          प्रत्येकाने विचार करावा आणि समजून घ्यावं कि चुका हा माणसांचा स्वभाव गुणधर्म आहे. त्यांची जाणीव हो