Posts

Showing posts from 2012

चारोळ्या...

पाऊस आणि मी कधीही बरसतो... मिलनाच्या ओढीने नकळत तरसतो...-- विक्रम वाडकर थेंब पडू लागले..अन हाक लागे श्रावणा... स्पर्श तुझा होता मनी ओल्याचिंब भावना...--विक्रम वाडकर मऊ मखमली तुझा स्पर्श हा, वेड लावतो माझ्या जिवा... शब्द वेडे मनात येती अन्, कसा सावरु माझी जिव्हा...--विक्रम वाडकर पाऊस धारांचा असो वा असो आठवणींचा... भिजवतोच तो मग उरतो ओला स्पर्श.. साठवणींचा...-- विक्रम वाडकर पावसाचे अन् माझे नाते जुने-पुराणे... माझ्या शब्दांना त्याच्या लयकारीचे गाणे...--विक्रम वाडकर सुईसारख्या बोचतात, कोसळणा-या सरी.. आठवणींच्या सुया.. असती माझ्या अंतरी..-- विक्रम वाडकर क्षण आहेत ओले सारे.. थोडा गोडवा अन् काही क्षार आहे त्यांना... वेचणा-या शब्दांना जरा जपून उचल...अजुनही धार आहे त्यांना...-- विक्रम वाडकर कधी कधी क्षणांना मोकळिक द्यावी आपण..फक्त आपल्यासाठी... मनातलं दुखः येऊ द्यावं आसवांतुन.. फक्त आपल्यासाठी...--विक्रम वाडकर. सर्व जणांमधे, खास आहे तु,   जागेपणी मिळणारा भास आहे तु, दुर ठेव तुजपासुन पण विसरु नको मजला.. माझ्या आयुष्याचा श्वास आहे तु-- विक्रम वाडकर विरह मांडु

ओघ

"येरे येरे पावसा" असं मन आता करत नाही... कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही... पाऊस येतो, स्मरणे देतो, जाणीव मजला करुनी देतो, तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच आता उरत नाही... चिंब पावसात, हातात हात, आठवणींची अशी बरसात, आठवणींच्या हिंदोळ्यातुन मन काही तरत नाही.... रात्रभर, ओली सर, शहारा फुलवी अंगावर, आता भिजुनी देहाचा माठ असा भरत नाही.... "येरे येरे पावसा" असं मन आता करत नाही... कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही... कारण तुझ्या आठवणींचा ओघ काही सरत नाही... ----- विक्रम वाडकर (१८-मे-२०१२)

शेर अर्ज़ किया है.....

मैं काफिरों की तरह भटकता हूँ ; हर जगह कितनी बार ये सर पटकता हूँ ; गनीमत ये है की रास्ता हर वक्त सामने होता है , बस इन खयालो की दुनिया में फ़िर एक बार अटकता हूँ ....||  -----------------------------------------------  ऐ इश्क-ऐ-नादान तू कितना खूबसूरत है, हर घडी से जीक्र करता आशिकाना महूरत है; दिन रात हम उन्हीको याद किया करते है, फिर कहाँ वो चाँद और कहाँ मेरे यार की सूरत है..!!!! समंदर है इन आखो मे.. मगर रो नही सकता.. मोहोब्बत से मिली यादो को कभी खो नही सकता.. आज भी तेरी आखो का पाणी मेरे दिल मे ताजा है... उसी दिल के जख्मो को मै आज भी धो नही सकता....-- विक्रम वाडकर कु्छ दर्द बाकी है.. मेरे दिल के किसी कोने मे... याद करे हर आसु.. ये सजा है मेरे रोने मे... --विक्रम वाडकर आपको छीनने की गुस्ताकिया हम बार बार करेंगे.. अपने हाथों से जहर भी देदो... हम हजार बार मरेंगे.... --विक्रम वाडकर .बेवफाई का नाम मत देना इस जुदाई को..हम बेवफा नही... पुरी जिंदगी जी लेंगे तेरी यादो मे... बस कह दो,आप हमसे खफा नही.. --विक्रम वाडकर हम भी वही ख्वाब देख

प्रेम....

प्रेम म्हणजे वय विसरून जपलेल्या भावना.... प्रेम म्हणजे स्पर्श करून जाणलेल्या वेदना.... प्रेम म्हणजे रडताना आलेलं गालावरच हसू.... प्रेम म्हणजे मुद्दाम आणलेलं नाकारच रुसू.... प्रेम म्हणजे रागावलेला चेहरा पाहण्यासाठी केलेला उशीर.... प्रेम म्हणजे दुखावलेला मनाला दिलेला विश्वासाचा धीर... प्रेम म्हणजे दूर असणाऱ्या व्यक्तीला भेटण्याची आस.... प्रेम म्हणजे तिच्या मिठीत घेतलेला अखेरचा श्वास.... --विक्रम वाडकर

लोकधारा ३

(लावणी) रात एकली भयाण दिसती, संगतीला न्हाय कोणी बया... अन राया आता...उशीर होतोय जाया.... अहो राया आता...उशीर होतोय जाया....|| टक-मक बघतोय, माग माग फिरतोय, बघून एकलीच काया...  x २ अन राया हिला उशीर होतोय जाया...|| धुंद मदभरी... रात्र सुंदरी... बघून लाजतोय आईना.... अंगी शिरशिरी... ओठ थरथरी... मन हे ताब्यात राहीना.... बरी न्हाय ही रीत, घडल इपरीत....पडते मी तुमच्या पाया....अहो राया आता ...||१|| प्रीतीत भिजले... बाहूंत निजले... विसरुनी सा-या भयाला.... डोळ्यांत लाजले... मनात सजले... पाहुनी माझ्या प्रियाला.... पडले मी कशी फशी, जीवात जीव जशी... तुमच्या रुपाची छाया....अहो राया आता ...||२|| टक-मक बघतोय, माग माग फिरतोय, बघून एकलीच काया...  x २ अन राया हिला उशीर होतोय जाया...|| --विक्रम वाडकर