लोकधारा ३

(लावणी)

रात एकली भयाण दिसती, संगतीला न्हाय कोणी बया...
अन राया आता...उशीर होतोय जाया....
अहो राया आता...उशीर होतोय जाया....||

टक-मक बघतोय, माग माग फिरतोय, बघून एकलीच काया...  x २
अन राया हिला उशीर होतोय जाया...||

धुंद मदभरी... रात्र सुंदरी... बघून लाजतोय आईना....
अंगी शिरशिरी... ओठ थरथरी... मन हे ताब्यात राहीना....
बरी न्हाय ही रीत, घडल इपरीत....पडते मी तुमच्या पाया....अहो राया आता ...||१||

प्रीतीत भिजले... बाहूंत निजले... विसरुनी सा-या भयाला....
डोळ्यांत लाजले... मनात सजले... पाहुनी माझ्या प्रियाला....
पडले मी कशी फशी, जीवात जीव जशी... तुमच्या रुपाची छाया....अहो राया आता ...||२||

टक-मक बघतोय, माग माग फिरतोय, बघून एकलीच काया...  x २
अन राया हिला उशीर होतोय जाया...||

--विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १