व्यास

सुखादुखाच्या व्यासाभोवती.. आयुष्याचा परिघ घडतो..
प्रवास होवो कितीही खडतर, सुरुवातीवर शेवट जडतो..

झरा बघावा सुंदर निर्मळ, उंचावरूनी तोही पडतो..
जमिनीवरल्या अडथळ्यांना, एकाएकी जाऊन नडतो..

कधी सावरतो स्वप्नांमधुनी, सत्यामध्ये कधी बिघडतो..
आयुष्यातील खोल कवाडे, वेळेआधी कसा उघडतो..

क्षणाक्षणाला हा धडपडतो, परि कधीही ना तो रडतो..
विश्वासाच्या काडीवरती, माणसाचाही आधार दडतो..
-विक्रम वाडकर 30/06/2015 08:39 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १