आनंदकल्लोळ

पांथस्ताचा पाथ व्हावे.. सरल सरळ
समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ..
अपयशा पाचण्याचे.. द्यावे मज बळ..
समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ..

भुकेल्याचा घास व्हावा.. दुखेल्याचा खांदा..
रडवेल्या चेह-यांसाठी.. हसवण्याचा धंदा..
कष्टी झाल्या मनांचीही काढू नये कळ..
समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ..

आंधळ्याच्या हातची.. कधी व्हावी काठी..
माणसाचा जन्म आहे.. माणसांच्या साठी..
वित्ताचा हव्यास नको.. व्हावे चित्ताने निर्मळ..
समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ..

भांडणांचे सुर नको.. होती जवळचे दुर..
समजुनी घ्यावे सा-यां.. हटवुनी धुर..
पारदर्शी होऊ द्यावा.. मनाचा हो तळ..
समाधानी मन करी.. आनंदकल्लोळ..
-विक्रम वाडकर 08/05/2015 12:05 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १