डोळ्यामधले आभाळ

मुक्या मुक्या ओठांवरी नाव तुझे अडखळले..
डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले..

कळल्या न तुला भावना या मनाच्या..
आसवांत भाव ते विरघळले..
डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले..

(मनातलं ओठांवर आलं, पण शब्द मुके झाले...
सापडलीच होती वाटं, पण रस्तेच धुके झाले...)

भरली ओंजळ हास्याची अन्..
वासे सुखाचे निखळले..
डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले..

खिळली नजर.. ज्यात भरले जहर..
घाव दुखाचे भळभळले..
डोळ्यामधल्या आभाळाचे गुज ना तुज कळले..

-विक्रम वाडकर 17/05/2015 11:23 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १