जय जय महाराष्ट्र..

दुथडी भरूनी वाहणा-या नद्यांचे हे राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
ज्ञाना-तुकाच्या अभंगवाणीत रमलेले राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
शिवरायाच्या स्वराज्याचे स्मारक हे राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
स्वातंत्राच्या लढवय्यांनी भरलेले राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
चित्रपटांच्या जनकाचे, फाळकेंचे राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
साहित्यांच्या महाग्रंथानी तुडुंब हे राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
भारतभुच्या उदरामधले कणखर हे राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
सौभाग्याने जन्म मिळावा असे पावन राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
मराठमोळा बाज रांगडा मराठमोळे राष्ट्र..
बोला जय जय महाराष्ट्र..
-विक्रम वाडकर 01/05/2015 05:40 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १