ईश्वराची आत्मा

तुझ्या चरणी जग सारे घाली लोटांगण..
तुझ्यामुळे दिवस रोज आता वाटतो ग सण...

यश माझे होता त्यात तुझा शुभ-आशिर्वाद..
कष्टी होता कधी,.. पहिली तुलाच असे साद..

रोजच्या घासाला आई.. ओठी तुझे नाव..
ठसका लागता आई.. पहीली तुझी धाव..

कधी अडखळता मन तुझे शब्द देती धीर..
जिवनाच्या संगीताचा तु ग पहीलाच सुर..

शब्दामधे कसे मांडू ऋण अशा माऊलीचे..
साथ तुझी सदा असो जसे देहा सावलीचे..

आई तुझ्याच नावात.. मज मिळतो आधार..
'ई'श्वराच्या 'आ'त्म्याचा.. आई तुच असे सार..
-विक्रम वाडकर 10/05/2015 03:54 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १