सवे तुझ्या

रात्र ही मोहरली जशी..
मिठीमधे विरघळले मी तुझ्या..
तुझ्यासवे बेभानले अशी..
ओठांनी नशाळले मी तुझ्या..
मी तुला.. तु मला.. ओळखुया..
स्पर्शाने नव्या.. हर्षाने नव्या..
हरवल्या दिशा....
सवे तुझ्या....सवे तुझ्या....

श्वासांनी एकरूप व्हावे..
हरखून जावे.. मी पुन्हा..
अंग-अंग शहारून जावे..
हरवून जावे.. मी पुन्हा..
कुरवाळून या बटा.. ओढ लावून.. जाऊ नकोस तु मला..
मी तुला.. तु मला.. ओळखुया..
स्पर्शाने नव्या.. हर्षाने नव्या..
हरवल्या दिशा....
सवे तुझ्या....सवे तुझ्या....

तुझी कुशी.. माझी उशी..
तारे नभीचे.. असे सारे सोबती..
सोबतीला लागे ना कुणाची नजर..
हलके हलके मनामधे प्रेमाची लहर..
अशा बेधुंद रात्री.. बिलगावा तु मला..
मी तुला.. तु मला.. ओळखुया..
स्पर्शाने नव्या.. हर्षाने नव्या..
हरवल्या दिशा....
सवे तुझ्या....सवे तुझ्या....
-विक्रम वाडकर26/08/2015 12:01 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १