म्हणे त्याचं आणि माझं नातं काय..

म्हणे त्याचं आणि माझं नातं काय....
जेव्हा तो दुःखी असतो.. मनाला आधार हवा असतो.. मित्र म्हणून मला पाहतो...
आधार बनले त्याचा मी तर त्यात इतके वाईट काय?
म्हणे त्याचं आणि माझं नातं काय....

स्वतः मला हसवत राहतो..
माझे न ओघळलेले अश्रू पाहतो..
त्याच्या एका हास्यासोबत, हसले मी तर चुकलं काय??
म्हणे त्याचं आणि माझं नातं काय....

मीही चिडते कधी कुणावर..
राग होतो कधी अनावर..
असे असुनही माझ्यासोबत बसला तो तर बिघडलं काय?
म्हणे त्याचं आणि माझं नातं काय....

प्रेम आहे हे सत्य आहे...
मैत्रीमधे नित्य आहे..
मित्र म्हणावे तर समजून घ्यावे.. आम्हाला समजले.. मग तुमच काय?
म्हणे त्याचं आणि माझं नातं काय....

अरे नाते विचारता तुम्हीच सज्जन..
पहा स्वतःतच डोकावून काही क्षण..
इतरांच्या नात्याला पाहता..त्यावाचून तुमच अडलं काय?
म्हणे त्याचं आणि माझं नातं काय....

--विक्रम वाडकर 05/09/2015 01:35 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १