स्वातंत्रवीर

स्वातंत्र्याच्या खेळामधला कर्णधार तो..
रक्तानेही रंग भरणारा चित्रकार तो..
रणसंग्रामासाठी सज्ज नेहमी.. तो असे..वज़ीर..
त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर..स्वातंत्रवीर..

धडाडीत तो बोले तत्पर..
क्षणात भेदी सुक्ष्म मनांतर..
सुर्यालाही तेज अनावर..
राहणी असा जसा आहे फकिर...
त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर..स्वातंत्रवीर..

भारतभू चा विचार होता सदा मनी...
चातुर्याचा प्रत्यय देती क्षणोक्षणी...
असेल हिम्मत अशी कुणाच्या तरूणपणी..
झुकले नाही कोणासमोरही ज्याचे शिर..
त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर..स्वातंत्रवीर..

स्वातंत्राची बांधुण देण्या पायघडी..
एकाकी होऊन जो लढला असा गडी..
ज्याच्यासाठी सागरातली महाउडी..
आत्मविश्वासावर सोडूनी, सा-या फिकीर..
त्रिखंडात ही एकच घडला.. स्वातंत्रवीर..स्वातंत्रवीर..
--विक्रम वाडकर. 14/09/2015 04:38 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १