गणेश स्वरूप

सुंदर सोज्वळ.. गणेश स्वरूप...
असे तुची भुप.. जगदिश..

मनोहरी नेत्र.. कृपेचे सागर..
जोडतो मी कर.. तुजलागे..

कर्ण भले मोठे.. उदर विशाल..
चंद्रकोरी भाळ.. शोभतसे..

चरणात तुझ्या.. मिळतो रे स्वर्ग..
वाहतो मी अर्घ्य.. तुजसाठी..

विसरतो आम्ही.. मनातील चळ..
वाजवितो टाळ.. भक्तीमध्ये..

गजानन तुची.. तुची विघ्नहर्ता..
सारे तुझ्या करिता.. तुच्छ आहे..

सदा तुझा असो.. शुभ-आशिर्वाद..
तु निर्विवाद.. सुखकारी..

पाहण्यात तुला.. होतो मी ही दंग..
लिहीतो अभंग.. विक्रम हा..
- विक्रम वाडकर 21/09/2015 12:04 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १