माई - सिंधुताई सपकाळ

विदर्भात जनमली अशी एक बाई ,
जिच्या नशिबाला होती भलतीच घाई ;
मूर्तिमंत ठरली अशी आमची माई ,
नाव त्या मूर्तीचे असे सिंधुताई...||

कोवळेसे वय होते खेळायाचे,
आई-बापाला तीच्या भय होते याचे..
त्याच वयामधे तिचे लावले लगीन,
चिमुकली पोर झाली चीन-बिन..;
नवरा तो तिचा जणू होताच कसाई ...||१||

पंधराव्या वर्षी तिला लागले डोहाळे,
नवर्याने मात्र नाही सोडले चहाळे,
मारून-झोडपून तिला बाहेर काढले,
जगी दाखवण्यासाठी तिला गोठ्यात टाकले ;
तिच्या मदतीला आली गोठ्यातली गाई ...||२||

गोठ्यामधे तिला झाली सुंदरशी पोर ,
नशिबाच्या पुढे ना चाले कोणाचाही जोर ;
काय करणार अशी नार एकटी ?
ताकतही नाही अजुन तिच्या मनगटी ;
तिच्या मदतीला तेव्हा कुणी आलं नाही ...||३||

स्मशानात राहून तिने दगडी वेचल्या,
जळत्या सरणावर तिने भाक~या भाजल्या ;
पोरिसाठी कधी ती राहिली उपाशी,
तरी नाही घातले कधी गा~हाने नभाशी,
भूकेल्यासाठी ती झाली जणू मोठी ताई ...||४||

स्वताची पोर तिने परक्यास दिली , (दगडूशेठ हलवाई)
अनाथ मुलांची मग जबाबदारी घेतली ;
वाढवला तिने असा परिवार मोठा ,
मोठेपनाचा नाही आणला आव खोटा ;
हजार मुलांची आज आहे हीच आई ...||५||

घडवली तिने आज कितींची भविष्य ,
आहेत त्याची आता भली मोठी दृश्य ;
नव~यालाही तिने माफ करून टाकले ,
"पत्नी नाही माई होइन" वचन राखले ;
आज तिचा नवरा तिला बोलतो 'सिन्धुमाई' ...||६||

-------विक्रम वाडकर -------

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १