===विधवा===

कोणी जाणून घेइल का,तिच्या मनातील शल्य,
सोडून गेला नवरा, ठेवून असे निर्माल्य...|

जगने आता तिचे हे, असे फ़क्त पोरांचे,
एकटी आता ही विधवा, भय असे तिला चोरांचे...||

दिवस रोज उगवतो, घेउन नवी आशा,
तिच्या पदरी मात्र, असे फ़क्त निराशा...|

जसा सूर्य मावळतो, तशी तीही खरी मावळते,
दाटती अंधार मनातून, आतून तीही मग जळते...||

पोरांच्या पदरी नाही, बापाची भोळी माया,
विधवेच्या नशिबी आली, कसली ही उष्टी काया...|

पैशांची परवड झाली, सामाजिक प्रतिभा गेली,
तीच्या मनातून आता, जगण्याची इच्छा मेली...||

दिला कुणी आधार तर, उपकार तिच्या मनाला,
आयुष्य जगता येईल, तिला त्या एका क्षणाला...||

===विक्रम वाडकर===(०५-०४-१०)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १