माझी पहिली कविता..

माझ्या जिवनातील माझी पहिली कविता .............

जीवन- एक कोडं ??


काराल्यापेक्षा कडू असतं ,साखरेपेक्षा गोडं असतं ;
जीवन हे जीवन असतं, न सुटलेल कोडं असतं....

कधी असतात घरातच मोठ-मोठ्या गाड्या,
कधी जागाही मिळत नाही घरात बांधायला माडया,
या सर्व प्रपंचाला पैसा हेच तोडं असतं ||

जेव्हा जीवनात येतात आपल्या , दुखातली दुःख ,
त्यांचाही पाठलाग करतात क्षणभराची सुखं ,
कितीही दुःख आलं तरी ,सुखं मात्र थोडच असतं ||

कधी असतात आयुष्यात ,महाभारत-गीता ,
तर कधी येतात सीता , नीता , रिता ,
पण आयुष्याच्या हातगाडीला जीवनसाथीच जोड़ असतं ||

बालपनात आईची ,कुमारवयात नात्यांची ,
तरुणपनात मित्रांची ,म्हातारपनात नातवन्दांची ,
जीवनाच्या वाटेवर येणारं असही एक मोडं असतं ||

कधी फ़लातील रस बनावे ,कधी फुलातील सुगंध व्हावे ,
कधी पालवी होउन हिरवी , फांदीवरती मस्त झुलावे ,
इतकं मोठं झाड़ असलं तरी ,म्रुत्युचच त्याला खोड़ असतं ||||||||

-------------विक्रम वाडकर--------------

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १