परी

इवल्या इवल्या पावलानी परी आली अंगणात ,
२ जन्म होतात आपले, हे कळले त्या क्षणात..

क्षीण कितीही आला तरी विसरून जातो आपण,
बाळाच्या बंद डोळ्या मध्ये हरवून जात मन..

हातभर जिवाचा त्या कल्ला असतो फार,
आपल्याला मात्र तोही, सुरेल वाटतो  यार..

नाजूक अशा पंज्याने जेव्हा पकड होते घट्ट,
गहिवरून येते आतून जसा काळोख होतो मिट्ट..

बोबड्या बोबड्या शब्दांची जिभेला झाली सवय,
तिला बघून वाटत, कशाला दुसर बालपण हवय..

शांत झोपेत असली तरी हास्य असत ओठी,
इथून पुढच आयुष्य जगेन फक्त तुझ्याचसाठी...

- विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १