तु नसताना तु असण्याची

अजुनही ओठांवरी.. नाव तुझे रेंगाळते..
श्वासात या गंधाळते.. तुझे उष्ण उसासे..
तु नसताना तु असण्याची चाहूल का मज भासे..

ओलावल्या माझ्या मनाचे..
ओलावल्या पापण्यांचे..एक झाले मागणे..
जिवलगा ये परतुनी... हेच आता सांगणे..
तु नसताना तु असण्याची चाहूल का मज भासे..

माझ्या बटांशी तुझे खेळणे..
विसरू कशी सांग ना..
तुझ्या माझ्या त्या चुका..
भुलवू कशी सांग ना..
अस्तित्वाच्या सारीपाटाचे..बदलले सारे फासे..
तु नसताना तु असण्याची चाहूल का मज भासे..

-विक्रम वाडकर 25/04/2015 08:17 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १