माणुस


माणसाच्या 'मी'पणाला स्वार्थाचा चहाळा,
माणुसकीला लावलाहे, कायमचा टाळा..

रस्त्यावरल्या दगडाला बनवतो देव,
गरीबाच्या गरीबीची फक्त करी किव..

तोकडे कपडे तसे विचार तोकडे,
इभ्रतीच्यासाठी मग नभाशी साकडे..

पैसा पैसा करी इथे सोडतो ना कोणी,
खातो परी मरणा-याच्या टाळूवरले लोणी..

टिप देतो जिथे, अशा हॉटेलात खात,
दिसती ना अशा वेळी भिका-याचे हात..

कुठेतरी जेवणाचे पाट-पाट वाहे,
भुकेपरी मरणा-यांचा गुन्हा काय आहे..

माणुस म्हणून जगतो हे विसरले सारे,
मनामधे लपलेला माणुस शोधा रे..
मनामधे लपलेला माणुस शोधा रे..
-विक्रम वाडकर(२०-मार्च-२०१५)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १