राग

राग 'भैरवा' प्रातःकाले..
भक्ती वसे तित बंदिश ल्याले..
सखा 'जोगिया' 'विभास' बोली..
'रामकली' ने प्रभात झाली..
रिषभ कोमले 'आसावरी'..
'हिंदोल','तोडी' सकाळ करी..
'जौनपुरी'चे माधुर्याने..
रूणझुणले अन् रमले गाणे..
तृतिय प्रहरी स्वर 'सारंग'..
कानी पडता श्रोता दंग..
'भीमपलासी'अन् 'मुलतानी'..
संध्येलागे गावी 'धानी'..
'पुरीया धनाश्री' करूणाकारी..
'यमन' 'कल्याण' मिठास धारी..
रात्रौ होता 'जयजयवंती'..
आळविता तया पडते भ्रांती..
उत्तररात्री 'मालकंस' तो..
निशेसोबती कुशीत घेतो..
सांगितलेली विक्रमवाणी..
स्वरगंगेचे थोडे पाणी..
--विक्रम वाडकर ५-एप्रिल-१५

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १